|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘तरूण भारत’चा आज 22 वा वर्धापन दिन

‘तरूण भारत’चा आज 22 वा वर्धापन दिन 

स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात विविध कार्यक्रम

सायंकाळी स्नेहमेळावा, संगीत मैफल

4 जी विशेषांकाचे प्रकाशन

‘तरुण भारत सन्मान’ चे वितरण

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा निकाल

प्रतिनिधी /रत्नागिरी

वाचकांशी विश्वासार्हतेचे नाते जपत रत्नागिरीकरांच्या मनात घर करणाऱया ‘तरूण भारत’ च्या रत्नागिरी आवृत्तीचा 22 वा वर्धापन दिन बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने स्वा. सावरकर नाटय़गृहात विविध कार्यक्रमांनी वाचक, हितचिंतक, जाहीरातदारांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा रंगणार आहे.

अचूक व विश्वासार्ह बातमीच्या जोरावर गेली दोन दशके तरूण भारतने जिल्हय़ातील अग्रगण्य दैनिकाचा मान मिळवला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील वृत्तांना उत्तम प्रकारे प्रसिद्ध करून न्याय देणारा ‘तरूण भारत’ हे रत्नागिरीकरांचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. ही आवृत्ती आज 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात वर्धापन दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम साजरा होणार आहे. यावर्षी वर्धापन दिनानिमित्त ‘फोर-जी’ अर्थात ‘फोर्थ जनरेशन’ या विशेषांकाचे प्रकाशन सायंकाळी 4 ते 5 या वेळेत करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावर्षी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून निबंध लेखकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. चार गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील निबंधांचे तज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले असून त्याचा निकाल सावरकर नाटय़गृहात होणाऱया कार्यक्रमात जाहीर होणार आह. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 ते 6.30 वाजता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 6.30 वाजता ‘स्वराभिषेक प्रस्तुत’ संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळ्यादरम्यान आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे समाजाला ‘प्रकाशवाटा’ दाखवणाऱया काही निवडक व्यक्तींची व संस्थांच्या कार्याचा गौरव ‘तरूण भारत सन्मान’ पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. तरी वाचकांनी ‘तरूण भारत’च्या वर्धापन दिनाला उपस्थित रहावे, असे आवाहन तरूण भारत परिवाराने केले आहे.

वर्धापन दिनी ‘तरूण भारत’च्या के. सी. जैननगर येथील कार्यालयामध्ये श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे.

‘स्वराभिषेक’ संगीत मैफल रंगणार

वर्धापन दिनानिमित्ताने खास आकर्षण असणार आहे ते रत्नागिरीतील शास्त्राrय गायिका सौ. विनया परब यांच्या ‘स्वराभिषेक’ संस्थेतर्फे आयोजित संगीत मैफलीचे! लांजा तालुक्यातील आंजणारी येथील ‘महालक्ष्मी फूड प्रॉटक्ट’ ने या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. ही मैफल सायंकाळी 6.30 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहाच्या रंगमंचावर रंगणार आहे. या सुगम मैफलीत अभंग, भक्तीगीत, नाटय़गीत, भावगीतांसह लावणी, कोळीगीत अशा लोकसंगीताच्या बाजाच्या गीते, तसेच देशभक्तीपर गीतांची पर्वणी रसिकांना लाभणार आहे. विनया परब यांचे शिष्यगण यामध्ये गीते सादर करणार आहेत.

Related posts: