|Sunday, October 21, 2018
You are here: Home » भविष्य » कर्म चांगले असेल तर भाग्य देईल साथ

कर्म चांगले असेल तर भाग्य देईल साथ 

बुध. दि. 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2017

जर कुणाला चांगले म्हटले त्याच्या कार्याची स्तुती केली तर तो माणूस कसा आहे हे समजते व त्याच्याविषयी आदरभाव निर्माण होतो.  समाजात अनेक लोक एकमेकांची उणीदुणी काढून सतत त्यांच्यावर टीका करीत असतात. पाठीमागून टोमणे मारून त्याला छळत असतात. काहीजण एखाद्याविषयी भलते सलते काही तरी सांगून त्याच्याविषयी कुणाच्या तरी मनात सतत विष कालवत असतात, पण कुणी काही सांगितले तरी जोपर्यंत स्वत:च्या डोळय़ाने पहात नाही अथवा खात्री करून घेत नाही, तोपर्यंत कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्याच्याविषयी कलुषित भावना निर्माण करून घेणे हे केव्हाही वाईट. पण अशा लोकांना नियती हसत असते. पुढे काय ताट वाढून ठेवले आहे ते कळत नाही, नंतर मग देव आठवायला लागतो. ज्यावेळी संकटे येतात, त्यावेळी पूर्वी जर काही चांगले काम केलेले असेल अथवा लोकांच्या भल्याचा विचार केलेला असाल तर ऐनवेळी कुणाची तरी मदत मिळून ते संकट आपोआपच दूर होते. काहीजण मांत्रिकाकडून करणीबाधा, भानामती वगैरे करून आणतात व एखाद्याचे वाईट करण्याचा प्रयत्न करतात. पण दुसऱयांच्या तोंडाला काळे फासताना आपले हात प्रथम काळे होतात हे लोकांना कळत नाही. शहाण्या सवरत्या लोकांनी करणीबाधा व भानामती, गंडेदोरे यांच्या मागे चुकूनही लागू नये. नंतर ते फार वाईट रीतीने उलटते. लक्ष्मी कोपते व जे कुणी असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकार करत असतात, त्यांच्या पुढील पिढीला ते सारे भोगावे लागते. यातून कुणाचीही सुटका नाही. जळफळाट, मत्सर, पोटदुखी, ईर्षा, टीका, टोमणे मारणे, एखाद्याच्या मागून वाटेल तसे बोलणे, त्याची बदनामी करणे अशा प्रकारात गुंतलेल्यांना पहिला फटका आरोग्यावर बसतो. आजकाल जे नवनवे रोग निर्माण होत आहेत, त्यामागे वैद्यकीय कारणे काहीही असोत जर त्यांनी चांगली विचारसरणी बाळगली, रोग आपोआप बरे होऊ लागतात. वैद्यकीय उपचार करूनही  काही रोग बरे का होत नाहीत, यामागील कारणे शोधा. आपल्या वागण्यातच त्याचे उत्तर सापडेल. ‘कर्म तेरा अच्छा है तो भाग्य तेरी दासी है, दिल अगर साफ है तो घर मे मथुरा काशी है’ अशा अर्थाची एक म्हण आहे. जर आपले जीवन सुखी व समृद्ध क्हायला हवे असेल तर इतरांविषयी चांगली भावना ठेवण्याचा प्रयत्न  करावा. त्याचा कुठे ना कुठे तरी नक्कीच फायदा होतो. न होणारी कामे होतात व कितीही मोठी संकटे आली तरी त्यातून दैवीकृपेने हमखास सुटका होते. आर्थिक स्थिती सुधारते. आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. घरात सुख शांतता नांदू लागते. मुलाबाळांचे कल्याण होऊ लागते. घरातील व्यसने कमी होऊ लागतात. संसारसुखाचे होतात. एक वर्षभर हा प्रयोग करून पहा. वामन राव पै यांचे ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ हे पुस्तक वाचा व त्याप्रमाणे आचरण ठेवा. तुमचे जीवन पूर्ण बदलून जाईल व सुखाच्या वाटा दिसू लागतील. साधारण दिसणाऱया व रुप सौंदर्य काहीही नसलेल्या एका तरुणीचे लग्न जुळत नव्हते. सर्व उपाय करून ती थकली होती व प्रत्येकावर राग काढत होती. तिला फक्त चांगला विचार करण्यास सांगून अनुभव पहाण्यास सांगितले. दोन महिन्यात तिच्या चेहऱयावर हास्य फुलले, कारण ज्यावेळी ती इतरांविषयी चांगला विचार करू लागली, त्यावेळी आपसुकच तिच्या चेहऱयावर तेज दिसू लागले व स्थळेही सांगून येऊ लागली. चांगुलपणाचा किती चांगला अनुभव येतो याचे हे उदाहरण आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार करू लागलात तर कोणतेही प्रसाधन न वापरता तुमचा चेहरा आनंदी व आकर्षक दिसू लागेल. (भाग दुसरा)

मेष

घरात मंगलकार्याचे वेध सुरू होतील. या सप्ताहात आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील. अति उष्णता वाढणे, डोळय़ांचे विकार त्रास देऊ लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरी संदर्भात मनासारखे यश मिळेल. पण ताणतणाव वाढेल. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱया माणसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. व्यसनी लोकांपासून दूर राहणे हितावह ठरेल.


वृषभ

नोकरी व्यवसायाच्या बाबतीत चिंता वाढेल. पण कोठून ना कोठून चांगला मार्गही सापडेल. घराच्या बाबतीतील कोणताही व्यवहार जपून करावा. पत्नीच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील. भावंडाच्या बाबतीत शुभवार्ता ऐकावयास मिळेल. प्रेमप्रकरण व कुसंगत यापासून दूर राहणे चांगले. अचानक धनलाभाच्या संधी मिळतील. चांगल्या मित्रांच्या  सहकार्यामुळे अडलेली कामे मार्गस्थ होतील.


मिथुन

मानसिक ताणतणाव वाढविणारा हा सप्ताह आहे. नोकरी व विवाहाच्या बाबतीत अचानक शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांनी व तरुणांनी  अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. आर्थिक क्यवहाराच्या बाबतीतील अंदाज चुकतील. कोर्ट कचेऱया यापासून दूर रहा. प्रेमप्रकरणात फसवणूक होण्याची शक्मयता. त्यासाठी सावधगिरीने पावले उचला. नोकरीत मानाचे स्थान मिळेल. परदेश गमनाच्या संधी चालून येतील. संततीच्या बाबतीत आनंदाची वार्ता ऐकावयास मिळेल. प्रवासाचे बेत आखाल.


कर्क

 नोकरीमध्ये अति कामाच्या तणावामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील. शत्रंtच्या कारवाया सुरू होतील. कोणतेही मोठे व्यवहार करणार असाल तर जपून आणि योग्य मार्गदर्शनानेच करा. घरामध्ये शुभ कार्याचे बेत आखाल. मोठी खरेदी किंवा एखादे नवीन घर घेण्याचे स्वप्न पुरे करू शकाल. आरोग्याच्या बाबतीत संधीवात, हाडांचे दुखणे किंवा हाडांना सतत मार बसणे अशा घटना घडतील. प्रवासात अचानक अडचणी उद्भवतील.


सिंह

नोकरी व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. मोठय़ा पदाच्या नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. प्रवासात मोठय़ा व महत्त्वाच्या वस्तुंची काळजी घ्या. चोरी होण्याची शक्मयता. नोकरी वर्गाकडून त्रास जाणवेल. वडिलधाऱयां मंडळीची आरोग्याची तक्रार वाढेल. जवळच्या मित्रांच्या बाबतीत एखादी अशुभ वार्ता कानी पडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आवडत्या व्यक्तीचा हट्ट पुरवावा लागेल.


कन्या

वाहन चालविताना नियंत्रण ठेवा. घरात वातावरण शांत राहील याकडे लक्ष द्या. नोकरी व्यवसायात अचानक बदली बढतीचे योग. अडलेली महत्त्वाची सरकारी कामे एखाद्या ओळखीमुळे मार्गस्थ होतील. मटका, जुगार व प्रेमप्रकरण यापासून चार हात दूर राहणे योग्य होईल. कोठून ना कोठून या सप्ताहात हातात पैसा खेळू लागेल. संसर्गजन्य आजारापासून दूर रहा. भागिदारी व्यवसायात व्यवहार जपून करा. सामाजिक कार्यामुळे अचानक आपणास आनंदाची बातमी समजेल.


तुळ

शत्रूच्या कारवाया सुरू होतील. पण आपल्या कणखर स्वभावापुढे टिकू शकणार नाहीत. शिक्षण व नोकरी व्यवसायात आतापर्यंत आलेल्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. भांडण, तंटे, वाद विवाद यापासून दूर रहा. आध्यात्मिक ओढा निर्माण होईल. कोणतीही सरकारी कामे करताना अथवा कागदपत्रे निट वाचल्याशिवाय सही करू नका. नवनवीन योजना मनात आखाल. नवीन वास्तुच्या विषयक बोलणी होतील.


वृश्चिक

परदेश गमनाच्या संधी येतील. भाजणे, कापणे, दुखणे यापासून जपा. मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायात वरि÷ांची मर्जी राहील. सरकारी कामात व कोर्ट कचेऱयांच्या कामात मनासारखे यश मिळेल. व्यसनापासून  दूर राहिल्यास आर्थिक अडचणीवर मात करू शकाल. रोजच दिवाळी दसरा करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. शिक्षणात मनासारखे यश मिळेल. बँकेची पुस्तके, कागदपत्रे निट सांभाळून व हाताळून ठेवा.


धनु

वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी कळेल. कर्जप्रकरण व कोर्ट कचेऱयांची प्रकरणे रेंगाळतील. आर्थिक व्यवहारातून शत्रूपिडा निर्माण होतील. नोकरी व्यवसायात वरि÷ांची मर्जी वाढेल. उद्योग व्यवसायात मनासारखे यश मिळेल. परदेशात नोकरीची संधी येईल. मोठय़ा समारंभात अथवा कार्यक्रमात महत्त्वाच्या वस्तुंची काळजी घ्या. आजचे काम उद्यावर ढकलू नका. नातेवाईकांच्याकडून अथवा जवळच्या व्यक्तिकडून त्रास होण्याची शक्मयता.


मकर

हा सप्ताह आपणास कटकटीचा जाणवेल. आपल्या विरोधकांची मान झुकेल. अति जागरणामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील. नोकरीत एखादी शुभवार्ता ऐकण्यास मिळेल. कुटुंबात वादविवाद टाळा. नातेवाईकात  गैरसमज निर्माण होतील. उधार उसनवार व कर्ज कोणाला दिलेले असतील तर परत मिळण्याची शक्मयता. उद्योग व्यवसायात अचानक वाढ होईल. नातेवाईकांच्या आजाराची बातमी कळेल. साडेसातीचा आता जसा प्रभाव कमी आहे. तेवढय़ा वेळातच महत्त्वाची कामे करून घ्या.


कुंभ

आपण  केलेल्या कलाकुसरीचा लाभ उत्कर्षात होईल. नोकरीसाठी प्रयत्न केला असेल तर मनासारखी नोकरी मिळेल. रंगरंगोटी, सजावट व घरच्या कामासाठी आर्थिक खर्च कराल. संशयीवृत्तीमुळे काही प्रकरणे वादग्रस्त ठरतील. काही वाईट संगतीमुळे आर्थिक फटका बसेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती दाखवावी मनासारखे यश मिळेल. क्रीडाक्षेत्रात नावलौकीक. चालताना अथवा गाडी वगैरे चालवताना काळजी घ्या. दुखापत अथवा मार लागण्याचा संभव आहे.


मीन

नोकरी व्यवसायात प्रगती, बढतीचे योग, संततीची काळजी मिटेल. मित्र मैत्रिणींच्यासाठी खर्च कराल. घरात महत्त्वाच्या वस्तुची, कागदपत्रांची काळजी घ्या. गहाळ होणार नाहीत याकडे लक्ष द्या, संगीत, गायन, वादन या क्षेत्रातील लोकांना मनासारखे यश मिळेल. उधार, उसनवार यापासून दूर रहा. नोकरीत व घरातील ताणतणावामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तिच्या गाठीभेटीमुळे आनंदी व्हाल. नवनवीन व्यवसायाचे मार्ग सुचतील, पण विचारपूर्वक निर्णय घ्या.

Related posts: