|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कोकण विद्यापीठासाठी पुन्हा आंदोलन !

कोकण विद्यापीठासाठी पुन्हा आंदोलन ! 

कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाले पाहिज़े त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सध्याच्या गोंधळी कारभारातून किमान कोकणातल्या मुलांची सुटका होईल, असा दावा केला जात आह़े

कधी नव्हे एवढा गोंधळ वार्षिक परीक्षांच्या निकालाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात उडाल़ा मुंबई विद्यापीठ ही एक अति ताणाखालची व्यवस्था आह़े हे या पूर्वी पासून अनेक शिक्षणतज्ञ आणि राजकीय नेते म्हणत आहेत़ परीक्षांच्या निकालाच्या निमित्ताने हे सगळे पुढे आल़े आपत्कालीन परिस्थितीची कोणीच कल्पना केली नव्हत़ी आणि अडचणी निर्माण झाल्यावर कोणताच पर्याय नव्हत़ा विद्यापिठाची पुरती बदनामी झाल़ी एवढेच नव्हे तर कुलगुरूंवर अकार्यक्षमतेचा शिक्का पडल़ा

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न उभा राहिल़ा अनेकांना विद्यापीठातील परीक्षा उत्तीर्ण होऊन परदेशात जायचे होते तर काहींना अन्य ठिकाणी प्रवेश घेऊन शिकायचे होत़े विद्यापीठाच्या गोंधळी कारभारामुळे निकाल उशिरा लागले आणि अनेक मुलांची वर्ष वाया गेल़ी प्रत्येक मनुष्य दिवसाला वेगळे महत्व आह़े, असे मानले जात़े परंतु कित्येक विद्यार्थी वर्ष नासूनही त्यातून योग्य बोध विद्यापीठाने घेतला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आह़े

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत मुंबई शहर, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे भौगोलिक क्षेत्र येत़े या क्षेत्रात वाढणारी लोकसंख्या त्याबरोबर विद्यापीठावर वाढणारा ताण असे लक्षात घेउढन 1985 सालाच्या आसपास कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करण्यात आल़ी विद्यार्थी नाही तर किमान उपकेंद्र द्या, अशी मागणी पुढे आल्यानंतर विद्यापीठाकडून ती मान्य करण्यात आल़ी आणि रत्नागिरीला विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू झाल़े अन्न प्रक्रिया, पर्यावरण असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आल़े परंतु उपकेंद्राच्या मागणीसोबत करण्यात आलेल्या अपेक्षा काही पूर्ण होऊ शकल्या नाहीत़

परदेशामध्ये छोटी विद्यापीठे करण्याकडे कल आह़े आपल्याकडे मात्र व्यवस्था कितीही भारीत झाली तरी पर्याय शोधण्यापेक्षा आहे त्याच व्यवस्थेवर अधिकाधिक भार टाकण्यात समाधान मानण्यात येत़े एकेकाळी जागतिक कीर्तीचे असणारे मुंबई विद्यापीठ हे सध्या गैर कारभाराचा उत्तम नमुना ठरत आह़े

या पार्श्वभूमीवर कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाले पाहिज़े त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सध्याच्या गोंधळी कारभारातून किमान कोकणातल्या मुलांची सुटका होईल, असा दावा केला जात आह़े यापूर्वी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व्हेसर्वा अरूअप्पा जोशी यांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी केली होत़ी रत्नगिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिह्यांचे मिळून स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा, असे त्यांचे म्हणणे होत़े तत्कालीन वाजपेयी सरकारकडून विशेष निधी मिळवण्यासाठी त्यांनी खटपट केल़ी कोकण हे डोंगरी क्षेत्र असल्यामुळे येथे डोंगराळ क्षेत्राचे निकष लावावेत, आणि विद्यापीठाला मंजूरी द्यावी, असे त्यांचे म्हणणे होत़े

अरूअप्पा जोशी यांनी कोकणात अनेक शिक्षण संस्था चालकांची भेट घेतल़ी पुढे त्यांची बैठक आयोजित करून आपली मागणी बुलंद केल़ी त्यांच्या पश्चात ही मागणी मागे पडल़ी अलिकडे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास पाटणे यांनी पुन्हा एकदा तीच मागणी लावून धरण्याचे ठरवले आह़े

अलिकडे चिपळूणात एक बैठक झाल़ी त्याशिवाय तेथील. शिक्षण संस्थांच्या कार्यकर्त्यांनी आणि शिक्षण प्रेमी नागरिकांनी या लढय़ात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल़े कोकणात सध्या 100 हून अधिक महाविद्यालये आहेत़ सिंधुदुर्गात 38, रत्नागिरीत 45 आणि दक्षिण रायगडमध्ये 20 अशी 103 महाविद्यालये असून त्याकरिता वेगळे विद्यापीठ होऊ शकत़े, अशी मांडणी केली जात आह़े

यापूर्वी ड़ॉ राम ताकवले यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होत़ी या समितीने सांगितले की, चांगल्या शैक्षणिक कारभारासाठी पुणे, नागपूर, मुंबई या विद्यापीठांचे विभाजन करण्यात याव़े सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने देशात 1500 विद्यापीठाची गरज आह़े, अशी शिफारस केली आह़े शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याग राजन समिती नेमण्यात आल़ी या समितीने प्रत्येक जिह्यात एक विद्यापीठ व्हावे, अशी शिफारस केली होत़ी या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे, अशी मागणी करण्यासाठी योग्य आधार उपलब्ध असल्याचे म्हणणे मांडण्यात येत आह़े

कोकणात स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास समुद्र विज्ञान, सागरी पर्यटन, किनारपट्टीवरील विविध उद्योग यांना पूरक असणारे अभ्यासक्रम येथे सुरू करण्यात येतील़ देशात अन्यत्र नाही पण या प्रदेशाच्या गरजा ओळखून केवळ कोकणातच आहे, अशा प्रकारचे अनेक अभ्यासक्रम या विद्यापीठात सुरू होऊ शकतात़ केवळ पदव्या घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी घडवण्यापेक्षा विविध कौशल्य असणारी मुले अशा विद्यापीठातून बाहेर पडणे, हे महत्वाचे ठरणार आह़े

यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीत विद्यापीठ मागणी परिषद घेतली होत़ी विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र दुर्दशेविरूद्ध आवाज उठवला होत़ा ऍड़ विलास पाटणे आणि त्यांचे सहकारी स्वतंत्र विद्यापिठासाठी जनजागृती व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत़ विविध राजकीय नेते खासगीत अशा विद्यापिठाला पाठिंबा देण्याचे म्हणत आहेत़

सरकारकडे याविषयाची चौकशी केली असता सांगण्यात आले की, अशा विद्यापीठाला 150 कोटी रूपयांची गरज आह़े सरकार सध्याच्या परिस्थितीत इतकी रक्कम एकदम पुढे करू शकणार नाह़ी आर्थिक मुद्यांच्या कारणामुळे ही मागणी पुढे किती जाईल हा प्रश्न असला तरी जनमताचा रेटा उभा केल्यास सरकारला रक्कम उभी करावी लागेल आणि स्वतंत्र कोकण विद्यापीठ उभे करण्यासाठी विचार करणे भाग पडेल़ कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी जनमताचा रेटा हेच औषध त्या सरकारला योग्य मार्गावरून चालण्यासाठी पुरेसे ठरत़े नव्याने पुन्हा एकदा सुरू झालेले विद्यापीठ मागणी आंदोलन कोकणी लोकांच्या एकजुटीवरच अवलंबून आह़े