|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अल्बेर्तोचे विचारधन

अल्बेर्तोचे विचारधन 

अल्बेर्तो या अवलिया आणि विद्वान लेखकाच्या विविध ग्रंथांतून प्रकट झालेली अवतरणे वाचली तरी थक्क व्हायला होते. आवाका आणि अवाढव्य आकार लक्षात घेता त्याचे समग्र ग्रंथ वाचणे अशक्मय नसले तरी कठीणच आहे. पण दुधाची तहान ताकावर भागवावी तशी त्याची आणखीन काही अवतरणे वाचून आपण त्याच्या शब्दकळेचा आनंद घेऊ यात. 

1.वाचन म्हणजे समाजाशी नाते जडण्याची सुरुवात

2.कोणत्याही उत्तम वाचनालयाचे नुसते अस्तित्व देखील निरंकुश सत्तेला आव्हान असते. शतकानुशतके होऊन गेलेल्या सर्व हुकूमशहांना एका गोष्टीची पक्की जाणीव असते, ती म्हणजे अडाणी समाजावर राज्य करणे सोपे असते, एकदा समाज वाचायला शिकला की त्याला वाचनापासून परावृत्त करणे अशक्मय असते. हुकूमशहा फारतर त्याच्या वाचनावर मर्यादा घालू शकतो. 

3.मी जेव्हा एखादे पुस्तक गमावतो किंवा त्यागतो तेव्हा माझ्यातला एक अंश मरण पावलेला असतो आणि माझी स्मृती पुन्हा पुन्हा त्या पुस्तकाकडे धाव घेत असते.

4.आपले स्वतःचे पुस्तक घरातल्या पोटमाळय़ावर किंवा स्वयपाकघरात बसून वाचण्यात जी मौज आहे ती सार्वजनिक वाचनालयातले पुस्तक वाचण्यात नाही.  जुने पुस्तक हाती आल्यावर ते वाचताना मी त्यातल्या (आधीच्या वाचकाने ठेवलेल्या) सर्व खुणा जपण्याचा प्रयत्न करतो. मजकुरावर केलेल्या खुणा, एखाद्या पानाचा दुमडलेला कोपरा, एखाद्या मजकुराच्या समासात लिहिलेला शेरा किंवा कुठेतरी खुणेसाठी ठेवलेले बसचे तिकीट आणि मग पुस्तक वाचायला घेतो. 

5.आपण पुस्तके का वाचतो? निराशेच्या अंधारात आपल्याला पुस्तकांकडे वळावेसे का वाटते? बहुधा असे असेल की जे आपल्याला आधीच ठाऊक आहे (किंवा जे आपण भोगले आहे) ते बांधून ठेवण्यासाठी आपल्याला शब्द हवे असतात आणि ते शब्द पुस्तकात मिळतात.

 6.माझ्या पुस्तकांच्या मुखपृ÷ आणि मलपृ÷ या दोन्हीच्या मध्ये माझ्या स्मरणातल्या आणि मी विसरून गेलेल्या सर्व कहाण्या-अनुभूती असतात. माझ्या आसपासचे रिकामपण त्यांनी व्यापलेले असते.  

7.प्रत्येक पुस्तकाच्या आत त्याचे एक विश्व असते आणि तिथे मी आश्रयाला जात असतो.  आपल्याकडे पुस्तक असणे म्हणजे पुस्तकातल्या कहाण्या, शहाणपणाचे डोस, गतकाळाच्या नोंदी, विनोदी किस्से वगैरे सर्व काही त्यातून आपण आपली गोष्ट बनवू शकतो किंवा लेखक ते जगत असताना त्याच्या अनुभूतीचे साक्षीदार होऊ शकतो. 

Related posts: