|Monday, October 15, 2018
You are here: Home » उद्योग » 15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एन. के. सिंग

15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एन. के. सिंग 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नियोजन आयोगाचे माजी सदस्य एन. के. सिंग यांची 15 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अर्थ मंत्रालयाकडून करण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अर्थ व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव शक्तिकांत दास, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी, जॉर्ज टाऊन विद्यापीठातील प्राध्यापक अनुप सिंह यांना आयोगाचे सदस्य निवडण्यात आले. हा आयोग ऑक्टोबर 2019 पर्यंत केंद्र सरकारला आपला अहवाल सादर करेल. केंद्र आणि राज्य सरकारांचे अर्थ, तूट, कर्ज स्तर आणि महसूल वाढविण्यासाठीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात येईल. नवीन वित्त आयोगाच्या सूचना 1 एप्रिल 2020 पासून सुरू होत पाच वर्षांसाठी असतील.

Related posts: