|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » नोटाबंदी काळात ओव्हरटाईम केलेल्यांना मिळणार वेतन

नोटाबंदी काळात ओव्हरटाईम केलेल्यांना मिळणार वेतन 

सार्वजनिक बँकांकडून प्रक्रियेला प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नोटाबंदीच्या कालावधीत बँक कर्मचाऱयांनी केलेल्या मेहनतीचा त्यांना एक वर्षानंतर लाभ होणार आहे. या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकात काम केलेल्या कर्मचाऱयांना ओव्हरटाईमचे वेतन देण्यास मंजुरी देण्यात आली. याची प्रक्रिया एसबीआयने सुरू केली, असून उर्वरित बँका लवकरच सुरू करतील.

एसबीआयच्या मनुष्यबळ विभागाने शाखा प्रमुखांना यासंदर्भात पत्र लिहिले असून ओव्हरटाईम केलेल्या कर्मचाऱयांची माहिती देण्यास सांगण्यात आले. नोटाबंदीच्या 37 दिवसांमध्ये ज्या कर्मचाऱयांनी ओव्हरटाईम केला आहे, त्यांना वेतन देण्यात येईल. नोटाबंदीच्या काळात ओव्हरटाईम केल्याप्रकरणी कर्मचाऱयांना वेतन देण्यात यावे, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत होती. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सने कर्मचाऱयांना वेतन देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Related posts: