|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » उद्योग » ऑनलाईन क्षेत्राकडून स्पर्धा अशक्य

ऑनलाईन क्षेत्राकडून स्पर्धा अशक्य 

किशोर बियानी यांचा दावा  ऑफलाईन किरकोळ व्यवसाय तेजीत

वृत्तसंस्था/ नागपूर

देशात वेगाने विस्तारत असलेल्या ऑनलाईन किरकोळ (रिटेल) व्यवसायाला बिग बझार आणि ईजीडे यासारख्या ऑफलाईन किरकोळ स्टोअर्सपासून स्पर्धा होईल. ऑनलाईन किरकोळ व्यवसायाचा बाजारातील हिस्सा कमी आहे, मात्र त्याचा खर्च अधिक आहे, असे फ्यूचर ग्रुपचे सीईओ किशोर बियानी यांनी म्हटले.

ऑनलाईन क्षेत्रातील उद्योजकांना आपल्याकडून जोरदार स्पर्धा देण्यात येत आहे, याची त्यांना जाणीव आहे. सध्या त्यांचा बाजारातील हिस्सा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. गेल्या काही वर्षात किरकोळ ग्राहकांकडून लहान हिस्सा फ्लिपकार्ट व ऍमेझॉनसारख्या संकेतस्थळांवरून किराणा वस्तुंची खरेदी करतो, असे त्यांनी म्हटले.

फॅशन, खाद्यान्न श्रेणीतील मागणी वेगाने वाढत आहे. एफबीबी, सेन्ट्रल आणि ब्रॅन्ड फॅक्टरी अशा साखळी स्टोअर्सची परिस्थिती चांगली आहे. ऑनलाईन क्षेत्राने ऑफलाईन क्षेत्राबरोबर देशात स्पर्धा करण्यासाठी अजून दहा वर्षे लागतील. अमेरिका आणि चीन डिजिटल झाल्याचे समजणे चुकीचे आहे. अमेरिकेत 89 टक्के आणि चीनमध्ये 82 टक्के हिस्सेदारी ही ऑफलाईन किरकोळ व्यवसायाची आहे. आपल्या कंपनीचे नाव फ्यूचर ग्रुप आहे, कारण आपण भविष्य पाहत पहिल्यापासूनच योजना तयार करतो, असे त्यांनी म्हटले.

 

Related posts: