|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे

जिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे 

प्रतिनिधी/ सोलापूर

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हय़ात सन 2017-18 या वर्षान नवीन 67 सिमेंट बंधाऱयांना मंजूरी देण्यात आली असून या कामाच्या निवीदा प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी दिली.

  जलसंधारणच्या माध्यमातून जमीन ओलीताखाली आणण्यासाठी शासनाकडून सिमेंट बंधारे व कोपो बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली जात आहे. या माध्यमातून जिल्हय़ात नवीन बंधारे व नाला खोलीकरणाचे काम केले जाते. यासाठी  डीपीसीच्या 8 कोटी रूपयांच्या नवीन 67 बंधारे व 65 ठिकाणी खोलीकरण अशा 132 कामांच्या निवीदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर सव्वातीन कोटी रूपयांच्या 29 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांचे येत्या 2 ते 3 दिवसात निवीदा प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

  याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेसाठी 265 गावांमध्ये 788 कामांसाठी 62 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

  चौकट

पुढील वर्षासाठी 47 कोटी रूपयांची मागणी 

 जलसंधारणसाठी सन 2017-18 साठी 12 कोटी रूपये मंजूर होते. परंतु जिल्हय़ात जास्तीत जास्त कामे करता यावीत म्हणून सन 2018-19 साठी डीपीसीमध्ये 47 कोटी रूपयांची मागणी करणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी सांगितले.

Related posts: