|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बेळोंडगी प्राथमिक उपकेंद्र असून अडचण अन् नसून खोळंबा !

बेळोंडगी प्राथमिक उपकेंद्र असून अडचण अन् नसून खोळंबा ! 

वार्ताहर/ संख

जत तालुक्यातील बेळोंडगी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. सध्या गावात डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतू आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी याकडे जाणीव पुर्वक दर्लक्ष करीत आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी युवा नेते सुरेश हत्तळी यांनी केली आहे.

येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱयांचा मनमानी कारभार सुरू आहे. गावात सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे. गावातील प्रत्येक वार्डात फवारणी करणे गरजे असताना येथील आरोग्य कर्मचारी हे या प्रकाराकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तसेच गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज अशी इमारत आहे. परंतु येथे येणारे कर्मचारी व आरोग्य सेविका यांना वेळेचे बंधन नसल्याने केंव्हाही येतात आणि केंव्हीही जातात. त्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागत आहे. तसेच येथे कायमस्वरूपी मुक्कामी आरोग्य नर्स किंवा आरोग्य सेविका यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी युवा नेते सुरेश हत्तळी यांनी केली आहे.

Related posts: