|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अनुलोभ संस्थेमार्फत विद्यार्थींना मोफत सायकल वाटप

अनुलोभ संस्थेमार्फत विद्यार्थींना मोफत सायकल वाटप 

विशेष प्रतिनिधी/ शिराळा

टाकऊ पासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत अनुलोभ संस्था व जनहीत ग्रुप इंचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आराळा येथे शालेय विद्यार्थींना सायकल वाटप करण्यात आले. यासाठी अनुलोभ संस्थेचे शिराळा विधानसभा क्षेत्र प्रमुख शशिकांत पवार व सुधीर बंडगर यांनी परीश्रम केले.

शासनाच्या अनेक लोक कल्याणाच्या योजना ग्रामिण भागातील लोकांपर्यंत पोचत नाहीत. या योजना लोकापर्यंत पोचवण्याचे काम अनुलोभ संस्था राज्यभर करत आहे. विचार, नेतृत्व, योजना कृती यातून एकात्मिकाकडे हे अनुलोभचे कार्य आहे. तसेच सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ यातून विकास करण्याची अनुलोभ संस्था करत आहे. शशिकांत पवार यामाध्यमातून काम करत असतात. ते भाग सेवक म्हणून कार्य करत आहेत. अनुलोभ संस्था आणि जनहित ग्रुप यांनी एकत्र येऊन ज्या सायकली वापरात नाहीत. काही सायकली अडगळीत आहेत. त्या सायकली गोळा केल्या. त्या दुरुस्त करुन शिराळा तालुक्यातील आरळा हे पश्चिमेकडील टोकाचे गाव या †िठकाणी हाय्यर एज्युकेशन सोसायटीच्या गांधी विद्यालयात आसपासच्या अनेक वाडय़ा वस्तीवरील मुली चालत येतात, अशा मुलींना या सायकली देण्यात आल्या.

यावेळी अनुलोभ चे भाग सेवक शशिकांत पवार, जनहीत ग्रुपचे अध्यक्ष प्रभाकर बाऊस्कर यांनी मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाचा हेतू व गरज सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.गोसावी हे होते. स्वागत व प्रास्ताविक क्रिडा शिक्षक सुधीर बंडगर यांनी केले. यावेळी क्रांतिवीर उमाजी नाईक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, पर्यवेक्षक ए.एस.घोरपडे, राजाराम जाधव, अनुलोभ इंचलकरंजीचे जनसेवक प्रभारक भोळ, दिपक जाधव, महादेव देसाई, दिपक वेदपाठक, विकास बेलेकर, यशवंत पाटील, कासिम नदाफ, आदित्य बेलेकर उपस्थित होते. आभार एस.एस.नलवडे यांनी मानले.

Related posts: