|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाघ आल्याची फलटण शहरात चर्चा

वाघ आल्याची फलटण शहरात चर्चा 

प्रतिनिधी./फलटण

वाघ आला वाघ आला म्हणत पहाटे पासून चर्चेला उधाण आले असून शहरातील मध्यवर्ती असलेल्या नवलभाई मंगल कार्यालयातील परिसरात दिसून आला होता या नंतर तेथील स्थानिक नगरसेवक यांना या बाबत त्या समक्ष पाहणायांनी दिली या वेळी खबरदारी म्हणून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी आले होते.

      परंतु तो वाघ बिबटय़ा का तरस या बाबतीत वनविभागाचे अधिकारी यांनी त्या भागासह फरांदवाडी भागाची पाहानी केले असता तेथील भागातील लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या व तसे काही वाटलेस वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

या नंतर 12 च्या सुमारास श्रीखंडे मळा विमानतळ ठाकूरकी या परिसरात ही दिसला असल्याचे तेथील एका महिलेने सांगितले या मुळे त्या भागातही वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून त्याचा शोध सुरू असून कोणीही घाबरून जाऊ नये असे वनपाल घाडगे यांनी सांगितले आहे.

   या मुळे त्या भागातील महिला व पुरुषांच्या मनात भीती निर्माण झाली असून नक्की हा प्रकार काय आहे या बाबत तर्क वितर्क निर्माण झाले असून पहाटे पासून शहरात भीती चे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग व पोलीस या बाबत साशंक असून या कार्यालयाच्या ठिकाणी करवा कुटुंबातील लोकांनी पाहिले असून ते पहाटे फलटण ते शिर्डीला प्रवासासाठी चालले असताना मोटारसायकलवरून लाईट पडल्या पडल्या तेथील उभ्या असलेल्या कार जवळून  उडी मारून पुढे गेल्याने वाघ का तरस होता या बाबत वनविभागाचे अधिकारी माहिती घेत असून सध्या शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Related posts: