|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चाचणीमध्ये तीस मल्लांची निवड

चाचणीमध्ये तीस मल्लांची निवड 

प्रतिनिधी/ सातारा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने रायगड येथे कै.खाशाबा जाधव 4 थी युवा ज्युनिअर फ्रिस्टाईल व ग्रिको रोमण, 40 वी कुमार सब ज्युनिअर होणार आहे. त्या स्पर्धेच्या चाचणीस्पर्धा सातारा तालिम संघात गेले दोन दिवस पार पडली. या चाचणी 30 मल्लांची निवड करण्यात आली आहे.

या चाचणीचे शुभारंभ पहिली कुस्ती साहेबराव पवार यांच्या हस्ते लावून झाला. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, खटावचे सभापती संदीप मांडवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून राष्ट्रीय पंच जितेद्र कणसे, अमरसिंह देशमुख, हिंदूराव लोखंडे, युवराज पवार, महालिंग खांडेकर यांनी काम पाहिले. निकाल पुढीलप्रमाणे ग्रिकोरोमणमध्ये 55 किलो वजनगटात प्रशांत शिंदे(अंतवडी, ता. कराड), 60 किलोमध्ये चंदन मगरगजे(कानवडी, ता. खंडाळा), 63 किलोमध्ये शुभम ढमाळ (असवली, ता. खंडाळा), 67 किलोमध्ये ओंकार शिंदे(जांब, ता. खटाव), 72 किलोमध्ये विपुल गुंडगे (कोळकी, ता. फलटण), 77 किलोमध्ये प्रथमेश कणसे (अंगापूर, ता. सातारा), 82 किलोमध्ये रोहन भोसले (वेळू, ता. कोरेगाव), 87 किलोमध्ये तेजस शिंदे (पाटखळ, ता. सातारा), 97 किलोमध्ये वैभव सावंत (दिवड, ता. माण), 130 किलोमध्ये तुषार ठोंबरे (शिंगणापूर), ज्युनिअर फ्री स्टाईल प्रकारात 57 किलोमध्ये गौरव कोळेकर (निढळ), 61 किलोमध्ये सुमित गुजर(खातगूण), 65 किलोमध्ये आशिष घाडगे (म्हावशी), 70 किलोमध्ये राहुल कोकरे (झिरपवाडी), 74 किलोमध्ये विशाल राजगे (पिंपरी), 79 किलोमध्ये अक्षय राऊत (गोखळी), 86 किलोमध्ये तुषार सरक (मिरगाव), 92 किलोमध्ये विशाल कोकरे (रांजणी), 125 किलोमध्ये राजेश्वर सुधीर पवार (सातारा), कुमार कुस्तीमध्ये 45 किलोमध्ये अनिकेत वाघमोडे (मिरगाव), 48 किलोमध्ये विशाल सुळ (खडकी), 51 किलोमध्ये शिवराज कणसे (अंगापूर), 55 किलोमध्ये सुरज गावडे (गोखळी), 60 किलोमध्ये यशराज यादव (कोपर्डे), 65 किलोमध्ये केशव गावडे (गोखळी), 71 किलोमध्ये चेतन गावडे (गोखळी), 80 किलोमध्ये अश्विनकुमार भुजबळ (अंगापूर), 92 किलोमध्ये अजिनाथ करे (पिंपरी), खुल्यामध्ये संग्रामसिंह पाटील (आटके) यांची निवड झाली आहे.