|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ऑक्टोबर 2017मध्ये ‘भीम’ ऍपची विक्रमी वाढ

ऑक्टोबर 2017मध्ये ‘भीम’ ऍपची विक्रमी वाढ 

 

प्रतिनिधी/ पणजी

नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ्ढ इंडियातफ्xढ अभिमानाने जाहीर करण्यात आले आहे की, भारत इंटरफ्sढस फ्ढाŸर मनी अर्थात ‘भीम’ या युनिफ्ढाईड पेमेंट इंटरफ्sढसद्वारे (युपीआय) केल्या गेलेल्या व्यवहारांच्या संख्येत मागील महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर 2017 मध्ये विक्रमी म्हणजे 149 टक्के वाढ झाली आहे. भीम युपीआय हे पैसा पाठविण्याचे आणि प्राप्त करण्याचे क्रांतिकारी पॅशलेस माध्यम आहे. भीम युपीआयचा उपयोग करुन ऑक्टोबरमध्ये तब्बल 7 कोटी 60 लाख वापरकर्ते आर्थिक व्यवहार केला आहे.

मोठय़ा संख्येने ग्राहकांनी दिलेली पसंती, भीम युपीआय समवेत व्यवहार करणाऱया 60 बँकांचा असलेला पाठिंबा, गुगल, फ्ढाsन पे यांच्या ऍप्सकडून होणारा वापर आणि मोठय़ा संख्येने व्यापाऱयांनी या व्यासपीठाचा केलेला स्वीकार यामुळे भीम युपीआयद्वारे व्यवहारांमध्ये ही अफ्ढाट वाढ झाली आहे.

भीम युपीआय हे ऍप ग्राहकांना देऊ करत असलेल्या जास्तीत जास्त सुविधांमुळे ते मोठय़ा प्रमाणावर लाखो ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे. तीस वर्षीय विक्री व्यावसायिक श्रीमती डेब्रा डी क्रूझा या भीम युपीआय ऍपच्या नियमित वापरकर्त्या आहेत. भीम युपीआय हे मोबाईलद्वारे पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वरदान आहे. ते अत्यंत जलद, अखंड चालणारे आणि वापरण्यास अतिशय सोपे आहे. माझ्या बँकेच्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून मी युपीआय वापरण्यास सुरुवात केली आणि भीम ऍपच्या बरोबरीने वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी खरेदी करताना आणि फ्tढडपांडावरुन खाद्यपदार्थ मागवण्यासाठी आणि किती तरी व्यवहारांसाठी त्याचा उपयोग करत आहे. फ्लिपकार्टवरून खरेदी करताना आणि फ्tढडपांडावरुन खाद्यपदार्थ मागवण्यासाठी युपीआयद्वारे पैसे भरले आहेत. आमच्या पिढीला सर्व काही अतिशय वेगवान हवे असते आणि या ऍपमुळे आमचा किती तरी वेळ वाचतो. माझ्यासारख्या लोकांना तर हे वर क्रूझ म्हणाल्या. तुमच्या फ्ढाsनच्या संपर्काच्या यादीत सअलेल्या आणि वैध युपीआय असलेल्या कुणीही पैसे पाठवण्यासाठी भीम ऍप अत्यंत उपयुक्त आहे.

भीम युपीआय हे दिवसाचे चौवीस तास आणि वर्षातील 365 दिवस कार्यरत असते आणि त्याच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या बँक खात्यात पैसे थेट जमा करता येतात. भीम ऍपचे आणखी एक वैशिष्टय़ हे आहे की भीम युपीआयचा वापर करणाऱया कुणालाही कलेक्ट ऑर्डर सुविधेचाही वापर करता येतो. याशिवाय ग्राहक केवळ ‘स्पॅन ऍण्ड पे’ ही सुविधा वापरुन कोणत्याही स्थानिक दुकानांना पैशाची फ्sढड करु शकतात. या व्यासपीठाच्या सुलभतेने आणखी एक वैशिष्टय़ हे आहे की तुम्हाला फ्ढक्त युपीआय आयडी तयार करायचा आहे. बँक खात्याचा क्रमांक तसेच आयएफ्ढएससी क्रमांक लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही.

भीम युपीआय वापरताना दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली ही की तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न करा आणि व्यवहार करताना बँक खात्याशी संलग्न केलेल्या मोबाईल क्रमांकाचे सीमकार्ड मोबाईल हॅडसेटमध्ये असले पाहिजे. भीम युपीआयचा वापर करुन कुणीही बँकेमध्ये न जाताच पैसे पाठवू शकतो किंवा प्राप्त करु शकतो.

Related posts: