|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » क्लबरोडवर युवकाला लुटले

क्लबरोडवर युवकाला लुटले 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर आणि परिसरात निर्जनस्थळी एकटय़ा-दुकटय़ांना गाठून त्यांची लुटमार करणाऱयांची टोळीच असल्याचे दिसून येत आहे. क्लबरोड येथे मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास एका युवकाला सोळा हजार रुपयांना लुटून त्याची मोटारसायकलही पळविली आहे.

याबाबतची माहिती अशी की, विनायक किशोर तुप्पट (वय 29) रा.सुळगा (हिंडलगा) हा आपले काम संपवून क्लबरोडमार्गे हिंडलग्याच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाला होता. वाटेत तो लघुशंकेसाठी थांबला असता डिओ मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी त्याला धमकावले. तुझ्याकडील ऐवज दे, अन्यथा चाकूने भोसकू, अशी धमकी त्यांनी दिली. त्यांनी विनायककडील सोळा हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याला ढकलून देऊन त्याच्या दुचाकीसह तेथून पलायन केले.

सदर घटनेने भांबावून गेलेल्या विनायकने रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांकडे मदतीची याचना केली. त्यावेळी येथून निघालेले सामाजिक कार्यकर्ते रवी कोकीतकर यांनी त्याची परिस्थिती जाणून घेतली. तसेच कॅम्प पोलिसात सदर घटनेची माहिती दिली.

Related posts: