|Thursday, January 17, 2019
You are here: Home » leadingnews » कोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप ?

कोपर्डीचा आज निकाल, नराधमांना फाशी की जन्मठेप ? 

ऑनलाईन टीम /  अहमदनगर  :

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज (बुधवार) शिक्षा सुनावली जाणार आहे. कोपर्डीतील १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.

अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी अकरा वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होईल. यावेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही दोषींना कक्षात आणलं जाईल. त्यानंतर न्यायाधीश आरोपींना शिक्षा सुनावतील. त्यामुळे या तिघांना कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडेच राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, आज सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Related posts: