|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » कोपर्डी प्रकरण ; तीन्ही नराधमांना फाशी

कोपर्डी प्रकरण ; तीन्ही नराधमांना फाशी 

ऑनलाईन टीम / अहमदनगर  :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तीन्ही दोषी नराधमांना अहमदनगर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात 21 नोव्हेंबर रोजी दोषी जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे यांच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला होता. तर 22 नोव्हेंबर रोजी खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला .मग विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीन्ही नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची  मागणी केली होती. 22 नोव्हेंबरलाच शिक्षा जाहीर होण्याची शक्यता होती.परंतु 29 नोव्हेंबर शिक्षेची सुनावणी होईल,असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तीन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ‘दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्याने माझ्या छकुलीला न्याय मिळाला ’,अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईने दिली. दरम्यहन ,जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधोत तिन्ही दोषी उच्च न्यायालयात दाद मागू शकतात,असे सांगण्यात येत आहे.