|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » विविधा » कोपर्डी निकाल ; सहा मिनिटांत कोर्टात नेमके काय झाले ?

कोपर्डी निकाल ; सहा मिनिटांत कोर्टात नेमके काय झाले ? 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

संपूर्ण राज्याचा हादरवून टाकणाऱया कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अहमदनगर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला आहे.

13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास दीड वर्ष हा खटला चालला. या दीड वर्षांच्या युक्तीवादानंतर आज शिक्षा सुनवण्यात आली.परंतु आज न्यायालयाने अवघ्या 6मिनिटात निकाल दिला.

सहा मिनिटांत कोर्टात नेमके काय झाले ?

न्यायाधेश सुवर्णा केवले सकाळी 11ः23मिनिटांनी न्यायालयात दाखल झाल्या. तीन्ही आरोपी जितेंद्र शिंदे,नितीश भैलुमे आणि संतोष भवाळ यांना कोठडय़ात बसवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले होते.

आरोपी जितेंद शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले. त्यानंतर न्यायधीशांनी सर्व आरोपींची नावे आणि वय वाचून दाखवले आणि लगेचच शिक्षा वाचण्यास सुरूवात केली. सर्वात आधी आरोप होते त्यामध्ये कटाकास्थान, पोक्सो, बलात्कार आणि हत्या अशा विविध आरोंपानुसार शिक्षा सुनावली. सर्वात आधी विविध कलमांनुसार जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कलम 302 अर्थात खून आणि कलम 376 अर्थात बलात्कार यासाठी तीन्ही आरोपींना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला ज्यावेळी दोषी धरण्यात आले होते, यावेळी तो म्हणाला होता शिक्षा एक दिवस काय आणि हजर दिवस काय ,शिक्षाही शिक्षाच असते.मात्र आज हाच जितेंद शिंदे न्यायलयासमोर हात जोडून उभा होता. त्यानंतर कोर्टाने आरोपींन फाशी सुनावली त्यानंतर पीडित मुलीच्या आईने एकच हंबरडा फोडला.दरम्यान, न्यायाधीशांनी आरोपींना गुह्यात वापरेले मोबाईल, दुचाकी यांचा लिलाव करण्याचेही आदेश दिल. त्याची जी रक्कम असेल,ती सरकारदप्तरी जमा होईल. आजच्या सुनावणीसाठी आरोपींपैका एकाचाही वकील उपस्थित नव्हता.

 

 

 

 

Related posts: