|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पीक आरोग्यधिकाऱयाची निवड करा

पीक आरोग्यधिकाऱयाची निवड करा 

माणसांच्या आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक आरोग्य केंदे अनेक गावामध्ये आहेत. काही गावांच्या समुहासाठी पाळीव जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणारे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. पण पिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱया शेतकऱयांना पीक संरक्षणाची माहिती उपलब्ध न झाल्यामुळे तो इतरांचे अनुकरण करीत राहतो. काहीवेळ औषध विपेत्यावर शेतकऱयांना अवलंबून राहावे लागते. दुकानदाराकडे न खपलेली औषधे अथवा त्यांच्याकडे असलेली औषधे देऊन दुकानदार स्वतःचा नफा कमवतो. पण शेतकऱयाला मात्र सर्व नुकसानीला सामोरे जावे लागते. शेत मालाचा व्यापार करणारे व्यापारी अथवा कृषी आदाने पुरविणारे दुकानदार अल्पावधितच गब्बर होताना दिसतात. पण उत्पादनाच्या कार्यात सतत मग्न आणि दंग असलेल्या शेतकऱयांची स्थिती मात्र वर्षानवर्षे सुधारत नाही. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालावे, नवनवीन कपडे घ्यावेत, मोबाईल, मोटार सायकल, टीव्ही, इतर अनेक सर्वसामान्य वस्तुंचा वापर अथवा उपभोग घ्यावा असे शेतकऱयालाही वाटते, पण सर्व दु:ख, कष्ट आणि व्यथा बाजूला ठेवून आपल्या मुलांना-मुलींना तो उद्याची आशा देऊन वेळ मारून जातो. हे वर्षानवर्षे चालू आहे. त्याची कीव कुणीच करीत नाही हे या व्यवस्थेचे दुर्भाग्य आहे. शेतकऱयांच्या व्यक्तिगत जीवनाकडे थोडे लक्ष द्या.

सुमारे शंभर वर्षापूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने परागीकरण प्रक्रिया घडवून नव्या  पिक-वाणांची निर्मिती झाली यालाच आपण हायब्रीड बियाणे म्हणतो. खुल्या परागीकरण व फर्स्ट फिलाईल जनरेशन (एफ-1) तंत्राने नव्या वाणांची निर्मिती केली असे म्हणतो. अनेक हंगामामधून दोन पिकांचे दोन वेगवेगळय़ा प्युअरलाईनचे प्रयोग करून त्यांच्या क्रॉस लागवडीद्वारे नव्या वाणांची निर्मिती केली जाते. हायब्रीड बियाणे तयार करण्यासाठी आठ-दहा वर्षे लागतात. शेतकऱयाला या तंत्रज्ञानाची काहीच कल्पना नसते. फळे, भाजीपाल्यांची ताण-संरक्षण-क्षमता वाढविणारे तंत्र विकसित झाले आहे. रोगावर मात करता आली, स्त्रीलिंगी व पुल्लिंगी परागीकणांची संख्या वाढून पिकांचे उत्पादन वाढले. पिकांचा कालावधी कमी झाला. पिकांची गुणवत्ता वाढविण्याचे अनेक प्रयोग झाले. हे प्रयोग कसे केले जातात याचे प्रशिक्षण आणि ग्रामीण प्रयोगशाळेतील अनुभवाचे शिक्षण आजच्या युवा शेतकऱयाला दिले पाहिजे. स्वतःला लागणारी बियाणे शेतकरी स्वतः निर्माण करू शकतो. पण याला बियाणे कंपन्यांचा विरोध असणे साहजिकच आहे. त्यांच्या हितासाठी सरकार ही जबाबदारी स्वीकारत नाही. प्रत्येक गावामध्ये फारमर्स इन्क्मयुबेशन लॅब असलेच पाहिजेत.

बियाणांच्या उत्क्रांतीतील म्युटेशन (बदल) तंत्राने वाणातील गुणवत्ता सुधारता येते. पण हवे ते बदल घडवून आणण्यात अनेक मर्यादा आहेत. पण सौम्यगतीने पिकांच्यामध्ये बदल आणता येतो. एक्स रे व काही रासायनिक घटकाद्वारे अनेक बदल मंदगतीने अंमलात येऊ शकतात. दुसऱया महायुद्धातील अणुस्फोटानंतर अणुशक्तीच्या साहाय्याने म्युटेशन तंत्राचा वापर सोपा झाला. गॅमाकिरण, प्रोट्रान, न्युट्रान, अल्फा आणि बीटा कणांच्या साहाय्याने पिकामध्ये बदल शक्मय झाले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने 3222 वाणांची निर्मिती केली आहे. केली ओह. शेतकऱयांना हवे ते बदल व हवी ती उत्पादकता कशी निर्माण होईल याचे प्रशिक्षण व स्वःनुभवावर आधारित असा समन्वय साधण्यासाठी विद्यार्थी-शेतकरी गट निर्माण झाले पाहिजेत. विद्यार्थी ज्यावेळी शेतकऱयाबरोबर राहील त्यावेळी खऱया अर्थाने दोघांनाही बरेच शिकता येईल. शेतकरी स्वतः आपल्या पिकांच्या आरोग्याधारी झाला पाहिजे. हे आतापर्यंत होऊ दिले नाही. त्यामुळे शेतकरी परावलंबी झाला. कृषी आदाने निर्माण करणाऱया कंपन्यांचे फावले. समूह, संस्था, संघटना आणि सरकार आपापले हितसंबंध जोपासत राहिले. शेतकऱयांचा लाभ त्यातच झ्घला. संस्था, समाज आणि सहकार यांच्याकडून फारसे शेतकऱयांच्या पदरात पडले नाही. सध्याची दुरावस्था यातूनच निर्माण झाली.

ऊतीसंवर्धन प्रक्रियेने चांगल्या उत्पादक वाणांची निर्मिती होते ही प्रक्रिया शेतकऱयांनी समजून घेतली पाहिजे. चांगल्या सेक्स सेल व डीएनएच्या संयुक्त विद्यमाने ऊतीसंवर्धनाची रोपे निर्माण केली जातात. चांगल्या वाणांचीच कॉपी होणे आवश्यक असते. पिकांच्या पेशी, टिश्यू किंवा एखाद्या चांगला भाग यापैकी कोणत्याही एकाचा वापर करून ऊतीसंवर्धनाची रोपे तयार केली जाऊ शकतात. यामुळे उत्पादनात वाढ होते, पण रोगावर नियंत्रण राहू शकत नाही. ऊतीसंवर्धनाची प्रयोगशाळा निर्जंतुक असावी लागते. तसेच नर्सरी व ग्रीन हॉऊस असावे लागते. केळी, रबर, बटाटे आणि टोमॅटोसाठी हे तंत्रज्ञान सर्रास वापरले जाते. फुलासाठी या तंत्राचा वापर करून आशियातील अनेक देशांनी फायदे घेतले आहेत. केळीवर पडणाऱया व्हायरल रोगावर मात करण्याची मायक्रोपॅगेशन तंत्राचा वापर करून केळीची नवी वाण फिलिपाईन्समध्ये निर्माण केली आहे. केनियामध्ये छोटय़ा शेतकऱयांना वरदान ठरणारे हे तंत्रज्ञान सिद्ध झाले आहे. ऑफ्रिकन भातावर संयोगिकरण प्रक्रियेने नवी नेरिका वाण बाजारात आली आहे. या सर्व तंत्राने शेतकऱयांच्या प्रगतीमध्ये वाढ होते. पण हे तंत्रज्ञान शेतकऱयांनी समजून घेतले पाहिजे. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती पिकामध्ये निर्माण करता आली पाहिजे. त्यासाठी रोगांच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी समजून रोगावर इलाज शोधता आला पाहिजे. ही प्रक्रिया कशी कार्यान्वित करायची याचे प्रशिक्षण शेतकऱयांना दिले गेले पाहिजे. अनेक रोगापासून पिकांना कसे मुक्त करता येईल, पिकांची उत्पादकता कशी वाढवावी, पिकांच्यापासून होणारी हानी कशी टाळता येईल याचे उत्तरे शोधावे लागेल. रोग प्रतिबंधक औषधावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. याचा फायदा औषध कंपन्यांनाच होतो. योग्य निदान करून पिकांना सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शेतकरी संशोधकाची आवश्यकता आहे. शेतकरी-विद्यार्थी आणि संशोधक एकत्रितपणे रोगावर संशोधक केली पाहिजे. युवा शेतकऱयांना हेसहज जमते. प्रत्येक गावामध्ये इनक्मयुबेशन लॅबची स्थापना केली. तर संशोधनाला गती मिळेल. रोग निदान शक्मय व्हावे, यासाठी जीवशास्त्र, पीक-प्रकृतीशास्त्र आणि जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने रोग निदान शक्मय झाले आहे. त्याचीसर्वसमावेशक कृती-साधने तयार केली जाऊ शकतात. रोग लागणीच्या काळातील किडीचा डीएनए आणि पिकांचा डीएमए. यांचा एकत्रित अभ्यास करून इलाज शोधता येतो त्यासाठी लॅब व प्रशिक्षणाची गरज आहे. रोग निदानाने किट (kit) आता तयार आहेत. भात बटाटे, पपई, टोमॅटो आणि केळीसाठी रोग निदानाचे किट उपलब्ध आहेत. हे शेतकऱयांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी प्रथमतः डीएमए.च्या संदर्भात प्रशिक्षण महत्वाचे आहे.  प्रत्येक गावामध्ये पीक-आरोग्याधिकाऱयाची निवड केली गेली पाहिजे. तीस-चाळीस वेळा प्रयोग करून डीएनए काढला जातो. केळीवरचे काळे डाग घालविण्यासाठी रोग-निदानाचे किट विकसित केले आहेत. या अनुषंगाने धोरणात्मक चौकट निर्माण होत नाही. कृषी आदानांच्या कंपन्याच्या उत्पन्नामध्ये सातत्याने वाढच होत असते, पण शेतकऱयांच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल होत नाही. प्रशासकीय यंत्रणा कंपन्यांचाच लाभ पहाते. आयुर्वेदासारख्या तंत्राचा वापर कृषी क्षेत्राला देखील लागू झाला पाहिजे म्हणजे आपोआपच अनेक कंपन्या बंद होतील. शेतकऱयांचे उत्पन्न वाढेल, निरोगी उत्पादन उपभोगायला उपलब्ध होईल. शिवाय पर्यायवरणीय संतुलन साध्य होईल. शाश्वत शेती ही चिरंतन विकासाचीच देणगी असली पाहिजे. चिरंतन आणि शाश्वत शेतीमुळे लोकांचे आरोग्य देखील चांगले राहील. म्हणूनच सुरक्षित अन्नधान्याच्या उपलब्धतेपेक्षा सुरक्षित अन्न व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.

Related posts: