|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तोंडवली नर्सिंग कॉलेजमध्ये 108रुग्णवाहिकेची माहिती

तोंडवली नर्सिंग कॉलेजमध्ये 108रुग्णवाहिकेची माहिती 

वार्ताहर / नांदगाव:

महाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प जीवनदायी रुग्णवाहिका 108 चा प्रसार होण्यासाठी सध्या विविध ठिकाणी जाऊन तिचा प्रसार व यात येणाऱया सुविधांबाबत तोंडवली नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्या शकुंतला मॅडम, 108 रुग्णवाहिका डॉ. चित्रा पाटील, तेजश्री पाटकर, प्रणाली कदम आदी उपस्थित होत्या. 108 या टोल फ्री क्रमांकाद्वारे रुग्णाला पहिल्याच तासांत सर्वात जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते. ही सेवा वर्षातील 365 दिवस उपलब्ध असून रुग्णांना मोफत पुरविण्यात येते, असे सांगून इतरही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

 

Related posts: