|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » बिटकॉईन पहिल्यांदाच 10 हजार डॉलर्स पल्याड

बिटकॉईन पहिल्यांदाच 10 हजार डॉलर्स पल्याड 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिटकॉईन या आभासी चलनाचे मूल्य पहिल्यांदाच 10 हजार डॉलर्सच्या पलिकडे पोहोचले. गेल्या तीन महिन्यांत बिटकॉईनचे मूल्य प्रचंड प्रमाणात वाढले असून काही तज्ञांकडून हा बुडबुडा फुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली. चालू वर्षात बिटकॉईनचे मूल्य 10 पटीने वाढले. बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीचे प्रमाण वाढत असून लोकांचे त्याच्याकडील आकर्षणही वाढले. ऑक्टोबरनंतर याचे मूल्य तब्बल 50 टक्क्यांनी वाढले. सध्या आभासी चलनाचे बाजारमूल्य 167 अब्ज डॉलर्सवर पोहोचले असून ते अमेरिकेच्या एस ऍण्ड पी 500 निर्देशांकाच्या 95 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

28 ऑक्टोबर रोजी बिटकॉईनच्या एका युनिटची किंमत 7,51,500 रुपये होती. 30 ऑगस्टला रोजी हे मूल्य 3,16,200 रुपये होते. म्हणजेच गेल्या तीन महिन्यात याच्या किमतीत 140 टक्क्यांनी वाढ झाली. बिटकॉईनचा प्रतिस्पर्धी असणारे ‘ईथर’चे मूल्यही उच्चांकावर पोहोचले आहे. याच्या एका युनिटची किंमत 30,272 रुपये आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक आता बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत आहेत. भारतात बिटकॉईनच्या वापराबाबत नियमावली नाही. जागतिक पातळीवर अनेक देशांनी हे चलन स्वीकारले नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घ्यावेत. अमेरिकन अब्जपती माईक नोव्हाग्रॅत्झ याच्यामते बिटकॉईनचे मूल्य 2018 पर्यंत 40 हजार डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

Related posts: