|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोपर्डीच्या निकालाने समाधान – केसरकर

कोपर्डीच्या निकालाने समाधान – केसरकर 

प्रतिनिधी / सावंतवाडी:

कोपर्डी बलात्कारप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांना अखेर न्यायदेवतेने न्याय दिला. याप्रकरणी राज्यभरात मोर्चा निघाले. त्याचे चीज झाले आहे. मी गृहराज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही घटना घडली होती. मी स्वतः पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचा आक्रोश पाहिला होता. नराधमांना फाशी व्हावी, ही  त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे मला समाधान वाटते. कोपर्डीप्रमाणेच सांगलीतील दोषींनाही फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

केसरकर म्हणाले, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी व ऍड. निकम यांनी प्रकरण चांगल्यारितीने हाताळले. त्यामुळे न्याय मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात लक्ष घातले. यंत्रणेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कोपर्डीप्रकरणी समाजबांधवांनी मोर्चा काढले. त्यांची पहिली मागणी शैक्षणिक सुविधांची आहे. त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोपर्डीप्रकरणी फाशी झालेल्या आरोपींनी अपिल केल्यास शासन सक्षम वकील नियुक्त करून फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Related posts: