|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » 6,500 कोटीच्या रिफंडची मागणी

6,500 कोटीच्या रिफंडची मागणी 

जीएसटींतर्गत निर्यातदारांची मागणी  अर्ज व्यवस्थित भरण्याचे आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जीएसटी लागू करण्यात आल्यापासून पहिल्या चार महिन्यात निर्यातदारांनी 6,500 कोटीचा रिफंडचा दावा केला आहे. रिफंडची प्रक्रिया पूर्ण करताना निर्यातदारांनी योग्य प्रकारे अर्ज दाखल करावा, असे सरकारकडून बुधवारी सांगण्यात आले.

आयजीएसटी रिफंड आणि इन्पुट टॅक्स क्रेडिट भरण्यासाठी 6ए आणि जीएसटीआर-3बी दाखल करावा. निर्यातदारांकडून काही महिन्यांपासून आयजीएसटी आणि इन्पुट टॅक्स रिफंड मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. हा अर्ज भरताना निर्यातदारांकडून अनेक चुका होत आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात येतो. निर्यातदारांना रिफंड लवकरात लवकर मिळण्यासाठी सरकारकडून नवीन प्रणाली सुरू करण्यात येईल. आताही निर्यातदार जुलैसाठी रिफंड दाखल करू शकतात आणि ऑगस्टसाठी जीएसटीआर-1 टेबल 6ए हा अर्ज 4 डिसेंबरपर्यंत दाखल करता येईल.

निर्यातदारांची इन्पुट टॅक्स पेडिटची रक्कम साधारण 30 कोटी रुपये आहे. निर्यातदारांना रिफंड आपोआप मिळावा यासाठी सरकारकडून नवीन प्रणाली सुरू करण्यात येईल. यामध्ये व्यवहार जुळत असल्याची तपासणी करण्यासाठी अधिकाऱयाची गरज भासणार नाही असे सरकारकडून सांगण्यात आले. 

 

Related posts: