|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » फेसबुकवर लवकरच वापरकर्त्याचे छायाचित्र ?

फेसबुकवर लवकरच वापरकर्त्याचे छायाचित्र ? 

वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को

जगभरातील दोन अब्ज वापरकर्त्यांच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी फेसबुककडून लवकरच वापरकर्त्यांना स्वतःचे छायाचित्र लावण्यास सांगण्यात येणार आहे. यामुळे एखाद्या खात्याचा वापर रोबोकडून करण्यात येत नाही हे कंपनीस समजण्यास मदत होईल. फेसबुकसारख्या सोशल मीडियावर समाजविरोधी संदेश पाठविण्यासाठी बनावट खात्यांचा वापर करण्यात येत असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. ग्राहकांच्या खात्याची सत्यता पडताळण्यासाठी कंपनीकडून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. एखाद्या वापरकर्त्याने स्वतःच्या छायाचित्राचा वापर न केल्यास खाते बंद करण्याचाही निर्णय फेसबुक कंपनीकडून जाहीर करण्यात येईल.

Related posts: