|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » सहा वर्षात पेट्रोल पंप संख्येत 45 टक्के वाढ

सहा वर्षात पेट्रोल पंप संख्येत 45 टक्के वाढ 

आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱया स्थानी   दरवर्षी देशात नव्याने उभारणार 2 हजार स्थानके

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील इंधन वितरक पेट्रोल पंपांच्या संख्येत गेल्या सहा वर्षात 45 टक्क्यांनी वाढ नेंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही देशात खासगी आणि सरकारी क्षेत्रात पेट्रोल पंपांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याचा हा विक्रम आहे. पेट्रोल पंपांच्या एकूण संख्येबाबत भारत सध्या अमेरिका आणि चीन या दोन देशांच्या मागे आहे.

पेट्रोलियम मंत्रालयानुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस देशात 60,799 पेट्रोल पंप होते. 2011 अखेरीस देशातील पेट्रोल पंपांची संख्या 41,947 होती. यापैकी 2,983 अथवा 7.1 टक्के पेट्रोल पंप हे रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि एस्सार ऑईल यासारख्या खासगी कंपनीच्या मालकीचे आहेत. सध्या देशभरात एकूण खासगी पेट्रोल पंपाची संख्या 5,471 अथवा 9 टक्के आहे. एस्सारच्या मालकीचे 3,980 स्थानके आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये प्रत्येकी एक लाख इंधन वितरक स्थानके आहेत.

2011 ते 2017 दरम्यान देशात पेट्रोल पंपांच्या संख्येत 18,852 ने वाढ झाली. देशातील एकूण 60,799 पेट्रोल पंपांपैकी 55,325 स्थानके सरकारी तेल वितरक कंपन्यांच्या मालकीची आहेत. पुढील काही वर्षात दरवर्षी 2000 स्थानकांची देशात वाढ होण्याचा अंदाज आहे. अनेक देशात पेट्रोल पंपाच्या संख्येत घट होत आहे. अनेक देशांकडून ईलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यात येत आहे, मात्र भारतात त्याविरोधी वातावरण आहे.  भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा खनिज तेल आयात करणारा देश आहे. 2015 मध्ये भारताने जपानला मागे टाकत इंधन वापरणारा अमेरिका आणि चीननंतर तिसरा देश बनला होता. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीत इंधनाच्या वापरात 9.5 टक्क्यांनी वाढ झाली होती.

Related posts: