|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » उद्योग » ‘बीसीसीआय’ला 52 कोटी दंड

‘बीसीसीआय’ला 52 कोटी दंड 

वृत्तसंस्था/ मुंबई

आयपीएल दरम्यान प्रसारमाध्यम हक्कावरून स्पर्धात्मक विरोधी कृती करण्यात आल्याने बीसीसीआयला 52.24 कोटी रुपयांचा दंड स्पर्धात्मक आयोगाकडून ठोठावण्यात आला. बीसीसीआय या क्रिकेट संघटनेच्या मंडळाला यापूर्वीही 2013 मध्ये दंड करण्यात आला होता. भारतीय स्पर्धात्मक आयोगाच्या 44 पानी आदेशात गेल्या तीन आर्थिक वर्षांच्या उलाढालीच्या साधारण 4.48 टक्के दंड करण्यात आला. 2013-14, 2014-15 आणि 2015-16 या आर्थिक वर्षातील सरासरी उलाढाल 1,164.7 कोटी रुपये होती.

फेबुवारी 2013 मध्ये बीसीसीआयला 52.24 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता. आता आयोगाच्या तपासणीदरम्यान आयपीएलच्या प्रसारमाध्यमाच्या करारात बोलीदारांच्या व्यावसायिक हिताचे संरक्षण आणि बीसीसीआयच्या आर्थिक हितांचे संरक्षण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 2013 मध्ये आकारण्यात आलेल्या दंडावेळी बीसीसीआयचे उत्पन्न वाढले असले तरी स्पर्धात्मक आयोगाने दंडाची रक्कम योग्य असल्याचे समर्थक केले आहे.

Related posts: