|Monday, December 17, 2018
You are here: Home » उद्योग » वायदे बाजाराच्या समाप्तीपूर्वी बाजारात दबाव

वायदे बाजाराच्या समाप्तीपूर्वी बाजारात दबाव 

बीएसईचा सेन्सेक्स 16, एनएसईचा निफ्टी 9 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

वायदे बाजाराच्या समाप्तीच्या अगोदरच्या सत्रात सुस्ती आली होती. निफ्टी आणि सेन्सेक्स कोसळत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकातही कमजोरी दिसून आली होती. बँक निफ्टी दिवसभर सुस्त होता. औषध आणि एफएमसीजी समभागात खरेदी झाली. रिअल्टी आणि मिडकॅप आयटी समभागात तेजी होती.

बीएसईचा सेन्सेक्स 16 अंशाने घसरत 33,602 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 9 अंशाने घसरत 10,361 वर स्थिरावला.

दिग्गज समभागांबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही कमजोरी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.17 टक्क्यांनी कमजोर होत बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक घसरत 18,210 वर बंद झाला. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 0.04 टक्क्यांच्या किरकोळ तेजीने बंद झाला.

बँकिंग समभागात सुस्ती असल्याने बँक निफ्टी 0.2 टक्क्यांनी घसरत 25,795 वर बंद झाला. बँक समभागाव्यतिरिक्त आयटी आणि धातू कंपन्यांच्या समभागात कमजोरी आली होती. निफ्टीचा धातू निर्देशांक 0.4 टक्के, आयटी निर्देशांक 0.3 टक्क्यांनी कमजोर झाला. बाजारात सुस्ती असूनही वाहन, एफएमसीजी, औषध, रिअल्टी समभागात तेजी आली होती. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.2 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.15 टक्के, औषध निर्देशांक 0.4 टक्के आणि रिअल्टी निर्देशांक 0.9 टक्क्यांनी वधारले.

दिग्गज समभागांची कामगिरी

दिग्गज समभागात विप्रो, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, हिंदुस्थान युनि, टाटा स्टील, भारती एअरटेल, बजाज ऑटो, कोल इंडिया, मारुती सुझुकी 1.33-0.50 टक्क्यांनी वधारले. ऍक्सिस बँक, एचडीएफसी, एशियन पेन्ट्स, एसबीआय, टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅब, हीरो मोटो 2.32-0.46 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात आयकॉम, सेल, टाटा ग्लोबल, दालमिया भारत, नॅशनल ऍल्युमिनियम, अदानी पॉवर, टोरेन्ट पॉवर, पेज इन्डस्ट्रीज, पेट्रोनेट, यूबीएल 3.49-2 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात स्टील एक्स्चेंज, एसीई, डुकॉन, गुडरिक, गीतांजलि जेम्स, एक्स्ट्रा मायक्रोवेब, जीएनए, रिलॅक्सो, जीटीपी इन्फ्रा 19-97-5.02 टक्क्यांनी घसरले.

Related posts: