|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता

राष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बुधवारी भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनला (बीएफआय) राष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी भारतीय हौशी मुष्टियुद्ध संघटनेची (आयएबीएफ) संलग्नताही रद्द केली आहे.

बीएफआयला याआधीच आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटने (एआयबीए) व क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली असून अखेर आयओएनेही त्यांना मान्यता दिली आहे. आतापर्यंत त्यांनी आयएबीएफला अधिकृत राष्ट्रीय संघटना म्हणून नोंदणी केली होती. ‘ऑलिम्पिक चळवळीच्या धोरणानुसार क्रीडा फेडरेशन्सनला आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मान्यता मिळणे आवश्यक असते. त्याचाच पाठपुरावा करण्यात आला आहे. बीएफआयला एआयबीएने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आयओएने ऑलिम्पिक चळवळीला दुजोरा देण्याचे काम केले आहे. हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे,’ असे बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंग यांनी सांगितले. बीएफआयने गेल्या वषी एआयबीए व क्रीडा मंत्रालयाच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत घेतलेल्या निवडणुकीनंतर कार्यकारिणी स्थापन करून कामकाज सुरू केले आहे.