|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ऊस दर जाहीर करा अन्यथा साखर कारखान्याचे धुराडे बंद पाडु-खा.राजु शेट्टी

ऊस दर जाहीर करा अन्यथा साखर कारखान्याचे धुराडे बंद पाडु-खा.राजु शेट्टी 

उंबरे येथे शेतकरी मेळावा व शाखा उद्घाटन

पंढरपूर/ वार्ताहर

सहकारमंञी सुभाष देशमुख यांनी एफआरपी प्लस 400 रुपये ऊसाचा दर जाहीर केल्याने तो दर जिल्हयातील साखर कारखान्यांना देणे बंधनकारक असुन पुढील आठ दिवसात जे साखर कारखानदार ऊसाचा दर जाहीर करनार नाहीत त्या साखर कारखान्यांचे धुराडे बंद पाडु असा इशारा स्वा†िभमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी यांनी दिला आहे.

उंबरे (ता.पंढरपूर) येथे स्वा†िभमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळावा व शाखा उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी शेतक-यांनी मेळाव्यास रेकॉर्डब्रेक गर्दि केली होती. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विजय रणदिवे, समाधान फाटे, नवनाथ माने, चंद्रकांत बागल, सचिन पाटील, विश्रांती भुसनर, महामुद पटेल, शिवाजी पाटील, राहुल घुले, अमर इंगळे, छान मुळे, संतेष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाजीराव विहीर येथे ऊस दर जाहिर करावा या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले समाधान फाटे, नवनाथ माने, चंद्रकांत बागल यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच आंदोलनात जखमी शेतकरी पांडुरंग बाबर यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना खा.राजु शेट्टी यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हयात साखरेची रिकव्हरी ही साडेतरा पर्यंत लागते पण सोलापूर जिल्हयात माञ हीच रिकव्हरी ही साडेनऊ पर्यंत कशी काय कमी लागते असा सवाल त्यांनी साखर कारखानदारांना केला आहे. सर्रास साखर कारखानदाकडुन रिकव्हरी कमी दाखवणे व काटामारी चालु असुन आपण आपल्या खासदार निधीतुन जिल्हयाला निधी देऊन वजन काटे उभारू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी रिकव्हरी कमी दाखवणे व काटामारीचे धंदे बंद करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकार यांनी सांगितले की, सहकारकंञ्यांनी ऊस दर जाहीर केल्याने जिल्हयातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर करणे बंधनकारक आहे. आंदोलन काळात शेतक-यांनी एकजुट दाखविल्यामुळेच सहकरमंञ्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतक-यांनी भविष्यात एकीन sराहुन शेतक-यांच्या प्रश्नावर एकञ येणे महत्वाचे आहे. देशामध्ये सर्वांच्या संघटना आहेत व त्या आपल्या मागण्या भांडुन मान्य करतात. त्यामुळे आपली शेतकरी संघटना मजबुत करून शेतकरी हिताच्या निर्णयासाठी काम करणे महत्वाचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन माघारी घेण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती व शेतक-यावरती खोटे गुन्हे प्रशासनाने दाखल करु जर दाखल केले तर त्यांना स्वाभिमानीच्या स्टाईलनेच उत्तर दिले जाईल.

शेतकरी मेळाव्यासाठी तालुक्यातुन व जिल्हयातुन असंख्य शेतकरी उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दि झालेली होती.

सहकरमंञी सुभाष देशमुख यांनी जाहीर केल्याप्रमाणे एफआरपी प्लस चारशे रुपयांचा ऊस दर देणे इतरही जिल्हयातील साखर कारखान्यांना बंधनकारक असुन त्यांनी जर आठ दिवसात ऊस दर जाहीन नाही केला तर त्या कारखानदारांच्या दारात जावुन बसु असा दमच खा.राजु शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे.

Related posts: