|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अन् शेतकऱयांनी उडीद जमिनीवर ओतले

अन् शेतकऱयांनी उडीद जमिनीवर ओतले 

प्रतिनिधी/ सांगली

धान्य खरेदी केंद्रावर एकरी दोन क्विंटल उत्पन्न गृहीत धरुन राज्य शासनाने धान्य खरेदीचे आदेश दिले. एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन घेतलेल्या शेतकऱयांच्यावर कवडीमोल दराने धान्य विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकरी 2 क्विंटलचा आदेश त्वरीत रद्द करावा व सर्व उत्पादीत झालेले सर्व धान्य खरेदी करावे या मागणींसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उडीद ओतून आंदोलन करण्यात आले.

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य सहकार आघाडी प्रचार संजय कोले, जिल्हा सरचिटणीस सुनिल फराटे यांच्यासह मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.  त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, मूग, उडीद, सोयाबीन धान्याचे खुल्या बाजारातील दर सरकारने निर्धारीत केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा खाली घसरल्याने सरकारने राज्यात ठिकठिकाणी धान्य खरेदी केंद्रे सुरु केली आहेत.

या केंद्रावर एकरी 2 क्विंटल उत्पादन गृहीत धरुन तेवढेच खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. हा आदेश शेतकऱयांसाठी नुकसानकारक ठरु लागला आहे. अनेक शेतकऱयांनी एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन केले आहे. त्यांना उर्वरित धान्य कवडीमोल दराने विकावे लागत आहे. यासाठी सर्व धान्य खरेदी करण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे. मागणीबाबत निर्णय न झाल्यास राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी कोले, सुनिल फराटे यांच्यासह शीतल राजोबा, रावसाहेब दळवी, मोहन परमणे, शंकर कापसे, राजू गुंडा माळी, बाशेखान मुजावर, आण्णा पाटील, वसंत भिसे, भगवान पाटील, अशोक शिंदे, भाऊसो कदम, वसंत खोत, अरुण उपळावीकर आदि शेतकरी उपस्थित होते.

Related posts: