|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निरीक्षक प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

 भाजपा सरकार सत्तेवर तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र या सरकारने केवळ घोषणा दिली परंतु कोणत्याच प्रकारची कामे केलेली नाहीत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. अशा विविध प्रश्नासाठी भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करीत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

  जनता उतरली रस्त्यावर. सरकार नाही भानावर, धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणावर सरकार नाही भानावर, जनतेच्या पैशाची बचत करा, फसव्या जाहिराती बंद करा, ढिम्म सरकार हलवू चला, फसव सरकार हटवू चला, स्मार्ट सिटीचे सल्लागार कोटय़ावधीचे लुटमार, शेतकऱयांचे सातबारा ताबडतोब कोरे करा, शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्या, अशा विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसर दणाणून गेला होता. तसेच विविध घोषणेचे फलकही पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेले होते.

 तीन वर्षापासून सत्तेवर असलेले भाजपा-शिवसेना सरकार सर्वच आघाडय़ावर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ घोषण देवून सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सर्वत्र महागाई वाढलेली आहे. त्यामुळे फसव्या भाजपा सरकारला धडा शिकविण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांनी केले.

 हल्लाबोल आंदोलन प्रसंगी कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर  प्रवीण डोंगरे, मल्लेश बडगु, महिला निरीक्षक निर्मला बावीकर, प्रदेश सचिव वैशाली गुंड, महिला आघाडी शहरध्यक्ष सुनीता रोटे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सुहास कदम, चंद्रकांत पवार, जनार्दन बोराडे, डॉ. गोवर्धन संचू, अनिल पानसे, आनंद मुस्तारे, प्रशांत बाबर, जावेद खैरादी, श्रीनिवास कोंडी, युवराज माने, राज बिटला, अहमद मासूलदार, अमीर शेख, करेप्पा जंगम, सिया मुलाणी, संगीता कांबळे, गौरा कोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: