|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » …तत्परता पालिकेची व्हॉल्व्हची केली दुरुस्ती

…तत्परता पालिकेची व्हॉल्व्हची केली दुरुस्ती 

प्रतिनिधी/ सातारा

वाढीव पाणी पुरवठा योजनेमधून सातारा पालिकेसमोर मोठी टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून रविवार पेठ, मल्हारपेठ यासह भागाला पाणी पुरवठा केला जातो. सकाळी या टाकीखाली असणारा पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला अन् लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पोलीस वसाहतीत पाणीच पाणी झाले. पालिपेच्या ही बाब निदर्शनास येताच पाणी पुरवठा विभागाने तत्परता दाखवत अवघ्या तीन तासात दुरुस्ती केली. यामुळे घटनेमुळे काही भागात पाण्याची टंचाई भेडसावणार आहे.

सातारा शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी मनोमीलनाच्या काळात वाढीव पाणी पुरवठा योजना करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शहरात सुमारे 12 टाक्या उभ्या करण्यात आल्या. त्यापैकी एक टाकीही पालिकेसमोरच उभी करण्यात आली. या टाकीच्या माध्यमातून सातारा शहरातील रविवार पेठ, मल्हार पेठ, पंताचा गोट, जेल परिसर, राजसपुरा पेठेचा काही भाग या भागांना मुबलक पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी या टाकीतून पाणी सोडणाऱया व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. काही नागरिकांनी पाणी मोठय़ा प्रमाणावर वाया जात असल्याची बाब पालिकेला सांगितली. पालिकेचे अभियंता द्विग्विजय गाढवे व पर्यवेक्षक संदीप सावंत यांनी तत्परतेने तेथे जावून पाहणी करुन लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यासाठी मोठय़ा खटपटी करुन लेथ मशिनवरुन हे काम करुन केवळ तीन तासात ही दुरुस्ती करण्यात आली. तेवढय़ा काळात लाखो लिटर पाणी हे पोलीस वसाहतीत गेले. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे दुरुस्ती झाली असली तरीही उद्या सकाळी मात्र या टाकीद्वारे होणाऱया भागात काही काळ कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

Related posts: