|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा पालिकेवर प्रशासक नेमायला हवा

सातारा पालिकेवर प्रशासक नेमायला हवा 

प्रतिनिधी/सातारा

सातारा शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपाचे सहा नगरसेवक झटत आहोत. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने आम्ही निधीही पाठपुरावा करुन आणला आहे. मात्र, सातारा पालिकेतील सत्ताधारी मंडळीकडून निधी खर्च केला जात नाही. रस्ते विकासाचा 3 कोटीचा निधी पडून आहे. कामेच केली जात नाहीत. विकासकामांना अडथळा आणणाऱया सातारा पालिकेवर प्रशासक नेमणे गरजेचे आहे. तरच जनतेची कामे होतील, असे परखडपणे मत भाजपाच्या नगरसेवकांनी व्यक्त करत सत्ताधाऱयांकडून केवळ जनतेची बोळवण केली जात आहे. साताऱयाला सर्वसामान्य आमदार, खासदार जेव्हा निवडून येतील तेव्हाच साताऱयाला अच्छे दिन येतील, असाही आरोप त्यांनी केला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते धनंजय जांभळे, पालिका पक्ष प्रतोद सिद्धी पवार, नगरसेविका प्राची शहाणे, विजय काटवटे, ऍड. प्रशांत खामकर, रवी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सिद्धी पवार म्हणाल्या, आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. त्याला वर्ष झाले. धोरणात्मक आणि विकासात्मक मुद्दे आम्ही प्रशासन आणि सत्ताधाऱयांसमोर मांडले. युनियन क्लब ही गेल्या 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष भिजत असलेल्या घोंगडय़ाप्रमाणे मुद्दाम दुर्लक्षित असलेली 46 गुंठे जागा जी पालिकेची आहे. ज्या जागेवर बगिचाचे आरक्षण आहे. अशी जागा आम्ही शासनाकडे आरक्षण विकसीत करुन लोकांकरता बगिचा व्हावा म्हणून तगादा लावला आहे. लवकरच ही अतिक्रमित जागा मोकळा श्वास घेईल यात शंका नाही. या प्रकरणाचा 10 महिने अभ्यास करीत आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या मदतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्या जागेवरील अहवाल पूर्णत्वास गेला आहे. अशी मोक्यावर असलेली जागा बळकावण्याचा घाट घातला आहे. तो उघडकीस आणून त्या जागा ताब्यात घेवून लोकांकरता बगिचा व्हावा म्हणून राज्य सरकारने अनुकूलता दर्शवली. तसेच उद्यान हे स्वर्गिय गोपिनाथ मुंडे स्मृती उद्यान या नावाने असावे, अशी सर्व भाजपा कार्यकर्त्यांची व समस्त सातारकरांची इच्छा असून जागा आता मोकळी होते. हे जाणून आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढण्याच्या सवयीनुसार साविआने पुन्हा एकदा गरिब जनतेला गाजर दाखवले आहे. मुळातच इतक्या वर्ष पडून राहिलेली दुर्लक्षित केलेली जागा आज मोकळी होते हे क्रेडीट मिळावे. या हेतूनेच खाऊ गल्लीला जागा देवू म्हणणाऱया बुद्धीची किव येते. मुळात शासनाच्या ध्येय धोरणानुसार बगिचाचे आरक्षण रद्द करता येत नाही. शहरविकास आराखडय़ाचे बगिचा विकसनामध्ये अशा प्रकारे स्टॉल, गाडे, गाळे, विकसित करता येत नाहीत. तरीही चौपाटीवरील गरीब जनतेची दिशाभूल करणे यात सत्ताधाऱयांना भूषण वाटते. यापूर्वीही असेच दिखावे दाखवून सत्ताधाऱयांना जनतेची बोळवण केली आहे. मनोरे दाखवून लोकांना गुंगवून यात सत्ताधाऱयांना महिरथ प्राप्त झाले आहे. राजीव गांधी बहुउद्देशीय इमारतीत महिला बचतगट विक्री केंद्र व्हावे अशी आम्ही पालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु आजअखेर या इमारतीत बचत गट केंद्रच उभे नाही. या ठिकाणी एक नगरसेविकेच्या कृपेने काय काय चालते हे सातारकरांना ज्ञात आहे. भाजी मंडईवरील हॉल जो गेली बरेच वर्ष पडून आहे. ते ठिकाण नागरिकांसाठी ‘जीम हेल्थ सेंटर’ म्हणून वापरात यावे असा प्रस्ताव दिला आहे. परंतु सत्ताधाऱयांना रस नाही. शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृह असावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिले. तरीही सत्ताधाऱयांनी केवळ क्रेडीट पॉलिसीचा विचार करुन कामच केले नाही. पोहण्याच्या तलावाचा प्रस्ताव लोंबकळत ठेवला आहे. रस्ते, भुयारी गटर, हरित प्रकल्प, घनकचरा निर्मूलन यासाठी निधी आणला आहे. आगामी काळात अनेक प्रोजेक्ट येवू घातले आहेत. या आधी असे कोणते प्रकल्प का आले नाहीत. कायम सत्ता केंद्र असणाऱयांना विकास अडलाय कुठे?, चकमोगिरीमुळे खुंटला आहे, असा आरोपही केला गेला. दरम्यान, विकासात्मक मुद्याला आडकाठी आणणाऱया नगराध्यक्षा माधवी कदम यांना पदावरुन हटवून सातारा पालिकेच्या विकासासाठी पालिकेवर प्रशासक नेमणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Related posts: