|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सिता हादगे आदर्श नगरसेविका पुरस्काराने सन्मानित

सिता हादगे आदर्श नगरसेविका पुरस्काराने सन्मानित 

प्रतिनिधी/ सातारा

परिवर्तन प्रतिष्ठाण कराड या संस्थेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून राज्य स्तरीय राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले आदर्श नगरसेविका पुरस्काराने सातारा पालिकेच्या नगरसेविका सौ. सीता  हादगे यांना अर्बन कुंटुबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व लागीर झालजी फेम श्रीमती कमल ठोके (जीजी) यांच्या हस्ते कराड येथे प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

  कराड येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी समाज कल्याण आयुक्त विजयकुमार गायकवाड, उपविभागिय अधिकारी हिम्मत खराडे, उपविभागिय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल नगरसेविका सौ.हादगे म्हणाल्या, खासदार उदयनराजे भोसले यांनी मला नगरसेविका या पदाच्या माध्यमातून 10 वर्ष शाहुनगरीची सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्यामुळेच मी समाजकार्य करत आहे. आजच्या पुरस्काराने इथुन पुढे अधिक जोमाने व क्षमतेने कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मला मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. या पुरस्कारा बद्दल त्यांचे सातारा  विकास  आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले व सातारा पालिकेच्या सर्व समितीचे सभापती व आजी माजी नगरसेवक, नगरसेविकांनी तसेच सातारा जिल्हा बुरुड समाज, कराड बुरुड समाज व राम हादगे मित्र परिवार यांच्या वतीने आभिनंदन करण्यात आले.

Related posts: