|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवशाहीचा काळ उभा करणार स्थानिक कलाकार लागले मेहनतीला

शिवशाहीचा काळ उभा करणार स्थानिक कलाकार लागले मेहनतीला 

बेळगाव / प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आजच्या पीढीला समजावा यासाठी ‘तरूण भारत ट्रस्ट’तर्फे जाणता राजा हे महानाटय़ येत्या 9 डिसेंबर पासून बेळगाव भेटीवर येत आहे. त्यासाठी स्थानिक कलाकार रात्रंदिवस मेहनत करीत आहेत. आपले नाटय़ त्या काळाप्रमाणे हुबेहुब सादर करण्याकडे या कलाकारांचा कल आहे.

जाणता राजा या महानाटय़ाचे दिग्दर्शक राहुल शिरोळे हे या कलाकारांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून अभिनय करून घेत आहेत. प्रत्येक प्रसंग त्यांना समजावून सांगून त्या काळातली पार्श्वभूमी सांगितली जात आहे. प्रत्येक प्रसंग हा कोणत्या पाश्वभूमीवर अवलंबून होता. हे त्या कलाकारांवर बिंबविण्यात येत आहे. शिवरायांची युद्धनिती, राजकारण, प्रजेविषयी असणारे प्रेम हे यातून कलाकारांना समजू लागले आहे. त्यामुळे कलाकार देखील जीव ओतून सराव करण्यात गुंतले आहेत.

शिवाजी महाराजांचे गुण, त्यांचे चातुर्य हे उमगू लागले-

स्नेहल जाधव (कलाकार)

मागील दोनवेळा देखील जाणता राजा या नाटय़ात काम केल्यामुळे आता थोडाफार विश्वास आला आहे. आपण शिवाजी महाराजांचा इतिहास हा वरवरचा वाचलेला असतो. परंतु या नाटकात काम केल्याने शिवाजी महाराजांचे गुण, त्यांचे चातुर्य हे उमगू लागले आहेत.

नाटय़ामध्ये काम करताना वेगळीच उर्जा मिळते-

किशोरी कुरणे (कलाकार)

शिवाजी महाराज हे असे राजे होते, की ज्यांनी सर्वांचा विचार करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या नाटय़ामध्ये काम करताना एक वेगळीच उर्जा मिळत असते. शिवरायांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी प्रत्येकाने हे महानाटय़ पहायला हवे.

Related posts: