|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » जम्मू – काश्मीरमधील 4 हजार दंगेखोरांवरील गुन्हे मागे,मेहबूबा मुफ्तींचे आदेश

जम्मू – काश्मीरमधील 4 हजार दंगेखोरांवरील गुन्हे मागे,मेहबूबा मुफ्तींचे आदेश 

ऑनलाईन टीम / श्रीनगर  :

2014 पर्यंत दगडफेक आणि आंदोलनात सहभागी झालेल्या चार हजारहून अधिक युवकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिले आहेत.

मागील वर्षी राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली नेमलेल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशीनंतर काश्मीरी युवकांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यास मंजूरी देण्यात आली. ‘इंडियन एक्सप्रेस’वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मूफ्ती यांनी ही घोषणा केली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या ‘आम्ही एक समिती नेमून त्यांना त्याप्रकरणी चौकशी करण्यास सांगितले होते. आम्ही आणखी एक आदेश जारी करून समितीला वर्ष 2015,16 आणि 17मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांची चौकशी करून 10 दिवसांच्या आत अहवाल सोपवण्यात सांगितले आहे. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.या माध्यमातून आम्ही येथील युवकांना आयुष्यात स्थिलस्थावर होण्यास मदत करू शकतो’’

Related posts: