|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » महाराष्ट्र महानच आहे, त्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही : मनसे

महाराष्ट्र महानच आहे, त्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही : मनसे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई आणि महाराष्ट्र महान होता ,आहे आणि राहिल ,महाराष्ट्राला महान बनवण्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही,अशा शब्दांत मनसेने मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.

मुंबईला महान बनविण्यात परप्रांतीयांचा वाटा आहे,असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले होते.त्यावर मनसेचे नेते नीतीन सरदेसाई यांनी प्रतीउत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. ‘महाराष्ट्र परप्रांतीयांमुळे महान होतोय, हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात.त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळे ते येतात,आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसे बनवू शकतात असा सवाल नितीन सरदेसाई यांनी केला आहे. तसेच मुंबई आणि महाराष्ट्र महान होता,आहे आणि राहिल, महाराष्ट्राला महान बनवण्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही, असे यावेळी सरदेसाईंनी सांगितले.

 

 

 

 

Related posts: