|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » गुजरातमध्ये पुन्हा ‘कमळ’; सट्टाबाजाराची भाजपलाच पसंती

गुजरातमध्ये पुन्हा ‘कमळ’; सट्टाबाजाराची भाजपलाच पसंती 

ऑनलाईन टीम /  जैसलमेर  :

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी सट्टेबाजांचा अंदाज, विश्लेषण साफ चुकले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीतही असाच फटका बसू नये यासाठी सट्टेबाज प्रचंड काळजी घेत आहेत. राजस्थानातील फालोडी आणि बिकानेर येथील सट्टाबाजारातील बुकिंनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत गुजरात निवडणुकीवरील सट्टा लावण्याचे प्रमाण 25 टक्क्यांनी घटले आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. उत्त

फालोडी आणि बिकानेर येथील सट्टाबाजारानुसार, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तुलनेत गुजरातमध्ये आतापर्यंत केवळ एक चतुर्थांश इतकाच सट्टा लावला गेला आहे. ‘उत्तर प्रदेशात भाजपला १९२ ते २०० जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र भाजपने मुसंडी मारत थेट ३२५ जागा जिंकल्या. त्यामुळे पंटर्सचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेच आता गुजरातमध्ये अनेकांनी हातचे राखून सट्टा लावला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीवेळी १ कोटी रुपयांचा सट्टा लावणारे आता काही हजार रुपयांचा सट्टा लावत आहेत,’ असे एका पंटरने सांगितले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पंटर्सचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहितीही त्याने दिली.

Related posts: