|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » Top News » जम्मू – काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू – काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / बडगाम :

जम्मू- काश्मीरमधील बडगाम सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून अजूनही शोध मोहिम सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरूवार सकाळपासून सुरक्षा दल आणि गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दरम्यान, या वर्षी भारतीय सुरक्षा दलांनी सुमारे 200 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,काही दहशतवादी गावात लपून बसल्याची माहितीसुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. भारतीय जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.दोन्ही बाजूंनी अनेक तास गोळीबार सुरू होता.यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला.दरम्यान,सोपोर येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून तिथे एक जवान जखमी झाला आहे.

Related posts: