|Thursday, January 17, 2019
You are here: Home » विशेष वृत्त »  एक रूपयांची नोट झाली शंभर वर्षांची

 एक रूपयांची नोट झाली शंभर वर्षांची 

ऑनलाईन टीम / पुणे  :

एक रूपयाची नोट शंभर वर्षांची झाली आहे. ब्रिटीशांनी 30 नोव्हेंबर 1917 रोजी एक रूपयाची नोट चलनात आणली होती. आज ही नोट शंभर वर्षांची झाली आहे.

एक रूपयाच्या नोटेवर इतर भारतीय नोटांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जात नाही,तर भारत सरकारकडून जारी केले जाते. त्यामुळे एक रूपयाच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नसते,तर केंद्रीय अर्थसचिवांची स्वाक्षरी असते. कायद्याच्या आधारे एक रूपयाची नोट ही खऱया अर्थाने ‘मुद्रा’नोट म्हणजेच करन्सी नोट आहे.

पहिल्या महायुद्धावेळी एक रूपयाचे चांदीचे नाणे चलनात होते. विशेष म्हणजे,हे नाणे चांदीपासून बनवले जायचे. मात्र युद्धादरम्यान चांदीचे नाणे बनवणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे 1917मध्ये पहिल्यांदा एक रूपयाची नोट चलनात आणली गेली आणि या नोटेने चांदीच्या नाण्याची जागा घेतली. एक रूपयाची नोट 30 नोव्हेंबर 1917मध्ये छापली गेली, या नोटेवर इंग्लंडचा राजा चॉर्ज पंचमचा फोटो छापण्यात आला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार एक रूपयाच्या नोटेची छपाई पहिल्यांदा 1926मध्ये बंद करण्यात आली होती. कारण नोट छापण्याचा खर्च परवडत नव्हता.त्यानंतर 1940मध्ये पुन्हा छपाई सुरू करण्यात आली,जी 1994 सालापर्यंत चालू राहिली.त्यानंतर 2015 साली पुन्हा छपाई सुरू करण्यात आली.

 

Related posts: