|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » ओयोची एमआयटी-आयडीशी भागिदारी

ओयोची एमआयटी-आयडीशी भागिदारी 

 पुणे / प्रतिनिधी :

देशभरात राहण्याच्या सुंदर जागा तयार करण्याची बांधिलकी आणखी दृढ करत ओयोने महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजाइन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन (एमआयटी-आयडी) यांच्याशी भागिदारी केली असून, त्याअंतर्गत पुण्यात डिझाइन प्रयोगशाळेची स्थापना केली जाणार आहे.

हे सर्जनशील सहकार्य ओयोच्या नव्याने लाँच करण्यात आलेल्या ओयो होम या विभागासाठी तसेच टाउनहाउस आणि ओयो रूम्ससह आपल्या हॉटेल ब्रँडसाठीच्या नाविन्यपूर्ण डिझाइन्ससाठी जागा व इंटेरियर डिझायनिंगचा स्रोत राहणार आहे. ओयो होम ही भारतातील पहिली गृहव्यवस्थापन सेवा असून, संस्थेच्या परिसरात स्थापन झालेली ही प्रयोगशाळा आंतर-शिस्तीचे शिक्षण केंद्र आहे. मुख्य विकास अधिकारी म्हणाले, हॉटेल्स, टाउनहाउसेस, अपार्टमेंट्स, व्हिलाज आणि घरे अशाप्रकारच्या निवासाच्या बहुआयामी क्षेत्रांमध्ये प्रवेश केल्यानंतर इंटेरियर, फर्निचर व जागेच्या डिझाइन क्षेत्रातील संशोधन आणि विकासाच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. एमआयटी आयडीशी झालेल्या सामंजस्य करारानंतर प्रवासी तसेच घरमालकांसाठी डिझाइनच्या अभिनव संधी तयार करण्याची क्षमता निर्माण होईल.

एमआयटी आयडीचे संचालक धिमंत पांचाळ म्हणाले, ही भागिदारी विद्यार्थी व शिक्षकांना ओयोसाठी धोरणात्मकदृष्टय़ा महत्त्वाच्या असणाऱया वास्तववादी आव्हानांवर काम करण्याची संधी देईल.

 

 

 

Related posts: