|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संस्थातून योगदान द्यावे

संस्थातून योगदान द्यावे 

प्रतिनिधी /जयसिंगपूर :

प्रत्येक मानवी घटकाने मुलभूत घटक म्हणून कार्यरत राहिल्यास शैक्षणिक क्षेत्राबरोबरच समाजाच्या सर्वच क्षेत्राची प्रगती होत असते. मी एक शिक्षक आहे, कुलगुरू आहे, यापेक्षा मी विद्यार्थ्याबरोबरच राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी योगदान देणाऱया संस्थेचा घटक आहे, या जाणीवेतून प्रत्येकाने कार्यरत राहावे. जागतिक आव्हाने पेलून राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी शिक्षकांनी शैक्षणिक संस्थातून योगदान द्यावे,  असे आवाहन भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या मानव संसाधन विकास विभागाने आयोजित कलेल्या ‘संस्थात्मक विकास व शिक्षक योगदान’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे बोलत होते. नॅकचे माजी संचालक व डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, हैदराबादचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एस. प्रसाद तसेच आय.आय.एम. तिरुचेरापल्लीचे संचालक प्रा. डॉ. भीमराया मेत्री उपस्थित होते.

प्रा. डॉ. व्ही. एस. प्रसाद म्हणाले, शिक्षकांनी त्यांना मिळालेल्या विद्यापीठ स्तरावरील  शैक्षणिक स्वातंत्र्याचा वापर विद्यापीठाचा दर्जा कसा उंचावेल व तो कसा टिकून राहील, यासाठी प्रयत्नशील राहावे. मानव संसाधन विकासात विद्यार्थी, पालक यांच्या गरजांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा ध्यास शिक्षकाने घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

प्रा. डॉ. भीमराया मेत्री यांनी विद्यापीठाने ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रमाबरोबरच संशोधनावर भर द्यावा. यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करावे, असे मत मांडले.

Related posts: