|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने कोपर्डी पिडीतेला आदरांजली

जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने कोपर्डी पिडीतेला आदरांजली 

कळंबा / वार्ताहर :

 कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना अहमदनगर जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने बुधवारी पिडीत मुलीला कॅन्डल मार्चद्वारे आदरांजली वाहण्यात आली. आरोपींना तातडीनं फासावर चढवावं, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.

  अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी  शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला होता. शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाचे पडसाद अवघ्या राज्यातच नव्हे, तर देशभरात उमटले होते. दरम्यान या खटल्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही अहमदनगर विशेष जिल्हा न्यायालयानं  दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सर्वसामान्य जनतेकडून स्वागत होतंय. कोल्हापुरातही जुनावाशीनाका येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं मेणबत्त्या प्रज्वलीत करून निर्भयाला आदरांजली वाहण्यात आली. न्यायालयानं दिलेल्या निकालामुळं पिडीतेला न्याय मिळालाय. आता शासनानं तिन्ही नराधमांना तातडीनं फासावर लटकवावं, अशी मागणी महिलांनी केली. या आंदोलनात सुवर्णा मिठारी, सरीता सासने, सुधा सरनाईक, सुनंदा चव्हाण, वैशाली जाधव, गीता डाकवे, वासंती साळोखे, विजयमाला गुरव, छाया पवार, सुरेश पाटील यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरीक मोठया संख्येनं उपस्थीत होत्या.

Related posts: