|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » लवकरच रेल्वे प्रवाशांसाठी खादीचे पलंगपोस

लवकरच रेल्वे प्रवाशांसाठी खादीचे पलंगपोस 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

खादीचे उत्पादन आणि विक्री यात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात अनेक उपायांची योजना केली आहे. त्यात आता रेल्वेचीही भर पडणार आहे. रेल्वेने लवकरच आपल्या प्रवाशांना रात्रीच्या झोपेसाठी खादीचे पलंगपोस, अभ्रे व इतर निद्रा साधने पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. टॉवेल व इतर साधनेही खादीचीच देण्यात येतील. ही माहिती दोन रेल्वे अधिकाऱयांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. सध्या या योजनेवरती गांभीर्याने विचार सुरू आहे. तथापि, अंतिम निर्णय डिसेंबरमध्ये घेतला जाईल. कदाचित रेल्वे आपल्या प्रवाशांना खादी किंवा अन्य साधनांचा पर्यायही देईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Related posts: