|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » वित्तीय तुटीच्या चिंतेमुळे शेअरबाजार घसरला

वित्तीय तुटीच्या चिंतेमुळे शेअरबाजार घसरला 

वृत्तसंस्था /मुंबई :

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीची आर्थिक आकडेवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारांच्या निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली आहे. ऑक्टोबर अखेरीपर्यंत एकूण वार्षिक वित्तीय तुटीच्या 96 टक्के तूट दिसून आल्याने शेअरबाजारावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. तथापि, या तिमाहीत विकासदरात समाधानकारक वाढ झाल्याने पुन्हा शेअरबाजार उसळी घेईल, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 453.41 अंकांनी घसरून 33,149.35 अंकांवर बंद झाला. बुधवारच्या तुलनेत ही घट 1.35 टक्के इतकी होती. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 134.80 अंकांच्या घसरणीसह दिवसअखेर 10,226.50 अंकांवर बंद झाला. नोव्हेंबरचा वायदा आणि ऑप्शन्स काँट्रक्ट संपण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस असल्यानेही बाजाराने घसरण अनुभवली, असे सांगण्यात येते.

गुंतवणूकदारांचे लक्ष आता प्रामुख्याने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आहे. त्यामुळे तोपर्यंत शेअरबाजारांमध्ये विशिष्ट मर्यादेत चढउतार होत राहील. त्यानंतर परिस्थिती पाहून गुंतवणूकदार पुढील हालचाली करतील, असे बाजारतज्ञांचे म्हणणे आहे.

दोन्ही बाजारांचे मुख्य निर्देशांक अधिक प्रमाणात घसरले असले तरी मिडकॅप निर्देशांकांना फारसा तोटा सहन करावा लागला. निफ्टी मिडकॅप केवळ 0.7 टक्क्मयांनी घसरला. मुंबई शेअरबाजारच्या मिडकॅप निर्देशांकातील घसरणही किरकोळ स्वरुपाची होती.

Related posts: