|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » येत्या सहा वर्षांत मोबाईल डाटा उपयोगात प्रचंड वाढ होणार

येत्या सहा वर्षांत मोबाईल डाटा उपयोगात प्रचंड वाढ होणार 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

सध्या जगभरात दर महिन्याला चौदा अब्ज जीबी इतका मोबाईल डाटा उपयोगात आणला जात आहे. येत्या सहा वर्षात त्यात आठपट वाढ होईल आणि उपयोगाचे प्रमाण 110 अब्ज जीबीपर्यंत पोहोचेल, असा कयास एरिकसन या कंपनीने व्यक्त केला आहे. डाटा उपयोगातील वाढ दरवषी 42 टक्क्मयांच्या चक्रवाढ गतीने वाढेल, असा अंदाज व्यक्त झाला आहे.

2023 मध्ये जितका मोबाईल डाटा उपयोगात आणला जाईल तो डिव्हिडीवर स्टोअर केल्यास आणि त्या डिव्हिडी एकमेकींवर ठेवल्यास 28 हजार 85 किलोमीटर उंचीची जागा व्यापली जाईल, अशी शक्मयता व्यक्त होत आहे. ही उंची आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्याही चाळीसपट जास्त असेल. हे अवकाश केंद्र पृथ्वीपासून 408 किलोमीटर अंतरावर आहे.

मोबाईल डाटा उपयोगामध्ये भारत अद्याप बराच मागे आहे. भारतात सध्या प्रतिमाह 3.9 अब्ज जीबी डाटा उपयोगात आणला जातो. 2023 पर्यंत सर्वाधिक वाढ भारताचीच होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतात स्मार्टफोन विकत घेण्याचे प्रमाण दरवषी 50 टक्के या गतीने वाढत असून त्यामुळे मोबाईल डाटा उपयोगाचे प्रमाणही प्रचंड होईल, असे अहवालात म्हटले आहे. लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया प्रशांतीय देश, मध्य युरोपीय देश, मध्य-पूर्व आफिका, पश्चिम युरोप येथेही मोबाईल डाटा उपयोग मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. भारतात प्रतिमाह 361 टक्के वाढ होईल, अशी शक्मयता आहे. 2023 मध्ये प्रत्येक भारतीय मोबाईलवर प्रतिमाह 18 जीबी डाटा उपयोगात आणला जाईल.

2023 पर्यंत मोबाईल डाटाच्या विविध प्रकारात व्हिडिओ उपयोगात आणण्याची वाढ सर्वाधिक असेल. ती एकंदर डाटाच्या एक चतुर्थांश इतकी असेल. त्यावेळी जग दर महिन्याला 82.5 अब्ज जीबी इतका व्हिडिओ डाटा पाहील, असाही अंदाज देण्यात आला आहे.

Related posts: