|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » थेरेसा मे यांच्यावर भडकले ट्रम्प

थेरेसा मे यांच्यावर भडकले ट्रम्प 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना सल्ला  दिला. मे यांनी माझ्यावर लक्ष न देता ब्रिटनमध्ये वाढत चाललेल्या दहशतवादावर लक्ष केंद्रीत करावे असे संतप्त ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांनी 3 मुस्लीमविरोधी चित्रफिती रीट्विट केल्या होत्या. यावर थेरेसा यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

माझ्यावर लक्ष देऊ नका, इंग्लंडमध्ये बळावणाऱया विध्वंसक कट्टरवादी इस्लामिक दहशतवादाकडे लक्ष द्या, आम्ही सर्व काही सुरळीत करत आहोत असे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये नमूद केले. ट्रम्प यांनी बुधवारी ब्रिटनच्या कट्टरवादी नेत्याच्या 3 प्रक्षोभक चित्रफिती शेअर केल्या. यावर थेरेसा यांच्या प्रवक्त्याने अध्यक्ष ट्रम्प यांनी असे करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.

ब्रिटन फर्स्ट ग्रूपचे नेते जैदा प्रँनसन यांनी पोस्ट केलेल्या चित्रफिती ट्रम्प यांनी शेअर केल्या. हा समूह ब्रिटनच्या उजव्या विचारसरणीच्या ब्रिटिश नॅशनल पार्टीचा माजी सदस्य आहे. ब्रिटन इस्लामीकरणाच्या दिशेने सरकत असल्याचे त्याचे मानणे आहे. ब्रिटन फर्स्टची स्थापना 2011 मध्ये झाली होती. याचे सदस्य समाजमाध्यमांवर वादग्रस्त पोस्ट करत असतात.

व्हाइट हाउसकडून बचाव

व्हाइट हाउसने ट्रम्प यांच्या मुस्लिमविरोधी चित्रफिती रीट्विट करण्याच्या कृत्याचा बचाव केला. सुरक्षेशी निगडित या मुद्यांवर अध्यक्ष अनेक वर्षांपासून बोलत आले आहेत, ते निवडणूक प्रचारापासून व्हाइट हाउसमध्ये दाखल होईपर्यंत हा मुद्दा उपस्थित करत आले. बुधवारी देखील ट्रम्प यांनी हाच मुद्दा मांडला. ते याविषयी ट्विटरवरील मतप्रदर्शन सुरूच ठेवतील, स्वतःच्या भाषणांमध्ये उल्लेख करतील असे व्हाइट हाउसचे माध्यम सचिव राज शाह यांनी म्हटले.

 

Related posts: