|Saturday, January 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 3-4 डिसेंबर रोजी मोदी गुजरातमध्ये

3-4 डिसेंबर रोजी मोदी गुजरातमध्ये 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या निवडणूक दौऱयावर 3 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये पोहोचतील. यादरम्यान मोदी तेथे 7 सभा घेणार आहेत. याशिवाय अहमदाबादमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमात ते भाग घेतील. 27-29 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये त्यांनी 8 प्रचारसभा घेतल्या होत्या.

भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी मोदींच्या पुढील गुजरात दौऱयाची माहिती दिली. मोदी 3 डिसेंबर रोजी सकाळी गुजरातमध्ये दाखल होतील, सकाळी 10.30 वाजता भरूच, दुपारी 12.30 वाजता सुरेंद्रनगर आणि संध्याकाळी 7 वाजता राजकोटमध्ये त्यांची सभा होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी पंतप्रधान अहमदाबादच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत. 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी दक्षिण गुजरातमध्ये 4 सभा घेतील. या सभा धरमपूर, भावनगर, जूनागढ आणि जामनगरमध्ये होणार आहेत. भाजप सरकारने राज्यात केलेला विकास पाहून काँग्रेसला नैराश्य आल्याचा आरोप भूपेंद्र यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

Related posts: