|Thursday, December 13, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वायूदलाला आणखी एक मोठे यश

वायूदलाला आणखी एक मोठे यश 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भारतीय वायूदलाने आकाशात आणखी एक यश प्राप्त केले. वायूदलाच्या एम्ब्रेयर वाहतूक विमानात हवेत उड्डाणावेळीच इंधन भरण्यात आले. हवेतच एका विमानातून दुसऱया विमानात इंधन भरण्याची ही कामगिरी निश्चितच महत्त्वाची मानली जात आहे. या तंत्रज्ञानाला एअर टू एअर रीफ्यूलिंग (एएआर) म्हटले जाते. याच्याशी संबंधित एक चित्रफित प्रसिद्ध करण्यात आली.

या क्षमतेमुळे भारतीय वायूदलाच्या सामर्थ्यात अनेकपटीने वाढ झाली. आपत्कालीन स्थितीत विमानात इंधन भरण्यासाठी आता ते लँड करण्याची गरज भासणार नाही. एम्बेयर प्लॅटफॉर्मवर हवेत इंधन भरण्याची प्रक्रिया साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आकाशात विमानात इंधन भरण्यासाठी वैमानिकांजवळ विशेष कौशल्याची गरज असते. हे कौशल्य भारतीय वैमानिकांनी निरंतर सरावाद्वारे प्राप्त केले. ज्या विमानात इंधन भरायचे आहे, त्याला इंधन टँकर स्वतःच्या बास्केटमध्ये योग्यप्रकारे सामील करावे लागते. या प्रक्रियेत विमानाला फ्लाइंग मापदंडांचे अचूक पालन करावे लागते.

या क्षमतेचे सार्वजनिक प्रदर्शन करणाऱया जगाच्या निवडक वायूदलांमध्ये भारतीय वायूदलाचा समावेश आहे. त्याचबरोबर एम्ब्रेयरने देखील याच वर्गवारीत आपली क्षमता सिद्ध केली. जर या प्रक्रियेत केवळ 10 मिनिटांपर्यंत इंधन भरले गेले, तर अतिरिक्त 4 तासांचे उड्डाण भरता येते. या कामगिरीने वायूदलाच्या मोहीम क्षमतेला मोठे बळ मिळाले.

Related posts: