|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » किरण खेर यांचे वादग्रस्त विधान

किरण खेर यांचे वादग्रस्त विधान 

चंदीगढ / वृत्तसंस्था :

चंदीगढ बलात्कार प्रकरणी भाजप खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांनी वादग्रस्त विधान केले. खेर यांनी पीडितेला सल्ला देत ऑटोरिक्षात 3 जण अगोदरच असताना तिने बसायला नको होते असे म्हटले. खेर यांच्या या विधानावर आता चोहोबाजूने टीका होत आहे. तर खेर यांनी स्पष्टीकरण देत स्वतःच्या विधानावर राजकारण होत असल्याचा आरोप केला. काळ अत्यंत खराब असल्याने मुलींनी खबरदारी घ्यावी इतकेच म्हटल्याचा दावा त्यांनी केला.

मोहालीमध्ये पेईंग गेस्ट म्हणू राहणाऱया 22 वर्षीय युवतीवर 17 नोव्हेंबरच्या रात्री रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले आहे.

जर रिक्षात अगोदरच 3 जण बसले असतील, तर त्यात तुम्ही बसू नये असे सर्व मुलींना सांगू इच्छिते. मुलींच्या सुरक्षेसाठीच हे सांगत आहे. जेव्हा आम्ही कधी बाहेर जायचो, तेव्हा जे पालक सोडण्यासाठी येत, त्यांना आम्ही रिक्षा किंवा टॅक्सीचा क्रमांक द्यायचो. सद्यकाळात देखील याकरता सतर्क रहावे लागेल असे खेर यांनी वक्तव्य केले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवनकुमार बन्सल यांनी खेर यांच्या वक्तव्यावर टीका करत याप्रकरणी अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केल्याने धक्काच बसल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यातून गंभीर प्रकरणाला त्या किरकोळ समजत असाव्या अशी टीकाही बन्सल यांनी केली.

Related posts: