|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयाच्या आत्महत्या करण्याच्या इशाऱयाने जिल्हाधिकारी गोंधळले

शेतकऱयाच्या आत्महत्या करण्याच्या इशाऱयाने जिल्हाधिकारी गोंधळले 

बेळगाव / प्रतिनिधी :

गोकाक तालुक्मयातील हुलीकट्टी गावातील शेतकऱयाचा शॉर्टसर्किटमुळे तब्बल 13 एकरमधील ऊस जळाला होता. जळालेला ऊस 24 तासात साखर कारखान्याने घेऊन जाणे गरजेचे होते. पण 3 दिवस उलटले तरी घटनास्थळी तहसीलदार तसेच कोणत्याच साखर कारखान्यान्या अधिकाऱयांनी भेट दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या हुलीकट्टी गावातील शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऊस घेऊनच मोर्चा काढला. यावेळी हे शेतकरी थेट जिल्हाधिकाऱयांच्या कक्षासमोर गेले. त्या ठिकाणी विषप्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा दिला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

शेतकऱयांच्या या रुद्रावतारामुळे जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. हे कक्षातून बाहेर आले. त्यांनी त्या शेतकऱयाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. माझा ऊस जळाला आहे. मी जगू कसा म्हणून जोरजोराने रडू लागला. एकही अधिकारी फिरकला नाही, यामुळे आम्ही काय करू? असा प्रश्न तो करू लागला. येथेच विष पिऊन मी आत्महत्या करतो, असे तो सांगत होता. या गोंधळामुळे जिल्हाधिकारी गोंधळून गेले. शेवटी त्या शेतकऱयाला हाताला धरून आपल्या कक्षात नेले व समजूत काढली.

हुलीकट्टी येथील शेतकरी रत्नाप्पा कल्लाप्पा गोणी या शेतकऱयाचा 13 एकरमधील ऊस जळून खाक झाला. हेस्कॉमच्या विद्युतभारित तारा त्याच्या शेतावरून गेल्या आहेत. याच बरोबर त्याच्या बांधावरच ट्रान्स्फॉर्मरही बसविण्यात आला आहे. मंगळवार दि. 28 रोजी दुपारी 3 च्या सुमाराला अचानक शॉर्टसर्किट झाले आणि हा संपूर्ण ऊस जळून गेला. त्यानंतर अनेकांनी याची माहिती तहसीलदारांना दिली. तसेच काही साखर कारखान्यांच्या अधिकाऱयांनाही कळविले. पण कोणीच ऊस नेण्यासाठी तसेच पंचनामा करण्यासाठी पुढे आले नाहीत.

Related posts: